वरोरा येथे अद्यावत ई-अभ्यासिकेचे होणार लोकार्पन

News34

वरोरा – वरोरा चे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली हे नगर पालिकेचे नगराध्यक्ष असतांना वरोरा शहरातील विद्यार्थ्यांची शैक्षनीक जिज्ञासा व वाचण्याची आवड लक्षात घेऊन त्यांना अद्यावत अशी अभ्यासिकेची गरज असल्याने व शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व वाचकांना वरोरा शहरात एकही परिपूर्ण लायब्ररी उपलब्ध नसल्याने तत्कालीन नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी २०१९ ला सदर वाचनालयाचा मंजुरीचा प्रस्ताव तत्कालीन अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा समोर सादर केला असता त्यांनी त्वरीत या प्रस्तावाला मंजुरी दिली व प्रधानमंत्री खनिज क्षेत्र योजनेचा निधीतून ३६६.२७ लक्ष रू.या अभ्यासिकेच्या बांधकामाकरीता दिला.

अहेतेशाम अली यांनी या अभ्यासिकेला माजी प्रधानमंत्री स्व. श्री. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव नगरपालिकेत आपल्या नगरसेवकांसोबत मिळून मंजूर केला सदर इमारतीचे बांधकाम आता पूर्णत्वास झाले असून ही ई- अभ्यासिका आता दि.२५ ऑगस्ट पासून वाचकांकरीता उपलब्ध होणार आहे.

या अभ्यासिकेचे लोकार्पन सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतिक व मस्त्य व्यवसाय,यांचे हस्ते होणार असून आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष – आमदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर राहणार आहे.

प्रमुख अतिथी म्हणून विधान परीषद सदस्य – रामदास आंबटकर,विधान परिषद सदस्य – अभिजित वंजारी, विधानपरिषद सदस्य – सुधाकर अडबाले राहणार आहे.प्रमुख उपस्थिती म्हणून विनय गौडा – जिल्हाधिकारी चंद्रपूर हे राहणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!