बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी पदाधिकारी पर्यटनाला रवाना

News34

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात मूल तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका नजरेसमोर ठेवून व सदर निवडणुकांची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वी देव -देवतांचे आशीर्वाद घेण्याकरिता माहूर देवी, शेगाव चे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा , शनी शिंगणापूर इत्यादी पवित्र स्थानाचे दर्शन घेण्याकरीता मूल येथून मूल तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी तिर्थटनाला निघाले.

Online shopping चा आनंद घ्या Amazon वर

येणाऱ्या निवडणुकीत घव -घवीत यश संपादन करीता देव-देवतांचे आशीर्वाद मिळवून येणाऱ्या निवडणुकीत अतिशय स्फूर्तीने विरोधकांना लढा देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यात जोश व ऊर्जा निर्माण व्हावी ह्या उद्देशाने आज दिनांक २५-०८-०२३ रोजी शुक्रवारला रात्री 9 .00 वाजता मूल तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी महाराष्ट्र महादर्शन यात्रे करिता रवाना झाले.

महाराष्ट्र दर्शन यात्रे चा लाभ मिळण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस चे बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष सुमीत समर्थ ह्यांनी स्वतः या सर्व पर्यटकांची संपूर्ण स्वखर्चाची जवाबदारी घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांना देवदर्शन व पश्चिम महाराष्ट्रतील कृषीउद्योग, राहुरी विद्यापीठ व विविध पर्यटन स्थळे बघण्याचा व आनंदाचा लाभ मिळवून देण्याचा विशेष प्रयत्न केलेला आहे.
ह्या पर्यटकांमध्ये ग्रामीण भागातून गाव प्रमुख ,शहरातून वार्ड प्रमुख अश्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!