Saturday, September 23, 2023
Homeचंद्रपूरश्री साई पाॅलिटेक्नीक चंद्रपूर येथे चंद्रयान ३ यशस्वी मोहिमेचा आनंदोत्सव

श्री साई पाॅलिटेक्नीक चंद्रपूर येथे चंद्रयान ३ यशस्वी मोहिमेचा आनंदोत्सव

चांद्रयान मोहीम फत्ते

- Advertisement -
- Advertisement -

News34

चंद्रपूर – भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचं सोनं झालं आहे. चांद्रयान २ मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान ३ च्या माध्यमातून पुसून काढण्यात आलं आहे. त्यामुळे श्री साई पाॅलिटेक्नीक चंद्रपूर च्या वतीने हे यश आनंदोत्सव म्हणून साजरा करतात आला. Isro

भारतीय यान यशस्वीपणे चंद्रावर उतरवण्याचा महत्त्वाचा टप्पा आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी पार पडला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला. चांद्रयानाचं लँडिंग यशस्वी होणारच असा ठाम विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) व्यक्त केला होता तो खरा करुन दाखवला आहे.

इस्त्रोनं सतीश धवन प्रक्षेपण केंद्र श्रीहरी कोटा येथून १४ जुलै रोजी चांद्रयान ३ चे प्रक्षेपण केलं होतं. त्यानंतर आज म्हणजेच २३ ऑगस्टपर्यंत प्रत्येक पातळीवर भारताला यश मिळालं होतं. यावेळी भारतानं ऑर्बिटर न पाठवता प्रॉपल्शन मॉड्यूल पाठवलं होतं. त्यामध्ये देखील अपेक्षेपेक्षा जास्त इंधन शिल्लक राहिले. या इंधनाचा उपयोग करून हे मॉड्यूल चंद्राभोवती पुढील किमान सहा महिने फिरत राहून पृथ्वीचा अभ्यास करेल.

इस्त्रो च्या या अभुतपूर्व यशाबद्दल श्री साई पाॅलिटेक्नीक चंद्रपूर च्या इलेक्ट्रॉनिक अॅंड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने आनंद साजरा करतात आला यावेळी चंद्रयान ३ चे प्रात्याक्षिक तयार करून सर्व वैधानिक यांचे अभिनंदन करून भारत माता कि जय, जय विज्ञान आश्या घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अभिषेक येरगूडे यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी या वैज्ञानिकांनी केलेल्या मेहनती, परिश्रमाकडून बोध घेऊन येणार्या पिढीने सुद्धा यामध्ये सहभागी होऊन नवनविन वैज्ञानिक अविष्कार घडवून आणले पाहिजे असे आव्हान केले तसेच टेक्निकल अभ्यासक्रमात संस्थेतील संशोधन करणार्यां विद्यार्थ्यांच्या पाठीशी सहकार्य करण्यासाठी संस्था सदैव राहील असा विश्वास दिला. यावेळी प्राचार्य पिल्लारे सर, पाकमोडे सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

संस्थेचे उपाध्यक्ष अभिषेक येरगूडे सर, प्राचार्य पिल्लारे सर,इलेक्ट्रॉनिक अॅड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. पाकमोडे सर, प्रा. निलेश बेलखेडे सर,प्रा धोटे सर , प्रा.पाटील मॅडम, प्रा.पाठक सर प्रा.बोबडे मॅडम, प्रा भालोटिया सर , सचिन ढेंगळे तसेच इलेक्ट्रॉनिक विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..