News34
चंद्रपूर – खाकी चं नाव ऐकलं की भल्या-भल्याना घाम फुटतो, मात्र आज पोलिसांचा प्रामाणिकपणा व कर्तव्यावरील संघर्ष काय असतो हे फक्त पोलीस कर्मचाऱ्यांना माहीत असते.
चंद्रपुरात आज पोलीस कर्तव्यावर काय संघर्ष करतात याचं उदाहरण पुढं आलं आहे, बाबूपेठ ते बल्लारपूर रेल्वे रुळावर अज्ञात इसम रेल्वेतून खाली पडला असावा, आणि त्याचा मृत्यू झाला.
सदर माहिती रेल्वे कर्मचारी यांनी चंद्रपूर शहर व महाकाली पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विजय मुक्के यांना दिली, मुक्के आपल्या सोबत पोलीस चमू नेत घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेहाची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात आधार कार्ड व पॅन कार्ड आढळून आले त्यामध्ये सदर इसमाचे नाव प्रेमलाल बाबूलाल पंचतीलक राहणार सालटेकरी बालाघाट, मध्यप्रदेश असे निष्पन्न झाले.
पोलिसांनी या घटनेची माहिती मृतक पंचतीलक यांच्या नातेवाईकांना दिली, मृतदेह बाबूपेठ व बल्लारपूर च्या मध्यभागात होता, त्याठिकाणी पोलिसांचे वाहन पोहचू शकले नाही, पोलिसांपुढे मृतदेह पुढे न्यायचा कसा असा प्रश्न उपस्थित झाला.
मात्र कर्तव्य निष्ठा मनात असली की पोलीस नेहमी चांगले काम करतात पोउपनी विजय मुक्के यांनी मृतदेह पायी नेण्याचे ठरविले, पोलिसांनी मृतदेह नाल्यातून व खडतर भागातून मार्ग काढत तब्बल अडीच किलोमीटर पायी आणला.
सदर कर्तव्यनिष्ठ कामगिरी पोउपनी विजय मुक्के यांच्या नेतृत्वात संजय धोटे व रेल्वे कर्मचारी व विसापूर गावातील अशोक तुराणकर यांनी केली.