Wednesday, November 29, 2023
Homeचंद्रपूरबावनकुळे साहेब चला ढाब्यावर

बावनकुळे साहेब चला ढाब्यावर

निमंत्रण भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना ईमेल

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर –  काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार हे टिल्लूपंप आहेत, तुम्ही त्यांना चहा पाजलात किंवा ढाब्यावर घेऊन गेलात तर बातम्या प्रसिद्ध करतात, असे सांगून पत्रकारांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरातील पत्रकार दुखावले असून त्यांच्यावर सर्वत्र निषेध प्रकट केला जात आहे.

 

या मालिकेत आज बावनकुळे यांना चंद्रपुरात ही निषेध करण्याचा निर्णय डिजिटल मीडिया संस्थेने घेतला आहे. डिजिटल मीडिया संस्थेने “या बावनकुळे धाब्यावर” या नावाने एक कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले असून त्यांनी बावनकुळे यांना रविवार, 1 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथील लोहारा ढाब्यावर रात्री 8:00 वाजता सावजी भोजनासाठी आमंत्रित केले आहे. बावनकुळे साहेबांनी आम्हाला ढाब्यावर पत्रकारांना अनेकदा खाऊ घातला आणि चहाही दिला, त्यामुळे आता त्यांच्यासाठी आमच्याकडून ही रिटर्न गिफ्ट पार्टी असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

 

या निमंत्रित मेजवानीला बावनकुळे साहेब आले नाहीत तर मात्र त्यांचा तिथे निषेध करण्यात येईल. येत्या नवरात्रीच्या काळा पासून त्यांच्या जिभे मधून कोणतेही वाईट शब्द येऊ नयेत यासाठी गणेशाने त्यांना सदबुद्धी आणि वरदान द्यावे, अशी प्रार्थनाही संस्थेने केली आहे.

 

संस्थेच्या या बैठकीत डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूरचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, जितेंद्र जोगाड, राजेश नायडू, दिनेश एकवणकर, जयपाल गेडाम यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular