Monday, June 24, 2024
Homeग्रामीण वार्ताचंद्रपूर मनसे जिल्हाध्यक्ष बालमवार यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराने साजरा

चंद्रपूर मनसे जिल्हाध्यक्ष बालमवार यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराने साजरा

49 रक्तदात्यांनी केले रक्तदान

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर/पोम्भूर्णा – चंद्रपूर जिल्हा मनसे अध्यक्ष राहुल बालमवार यांच्या वाढदिवसानिमित्त मनवीसे तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी तब्बल 49 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर चे तडफदार नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे पोम्भूर्णा शहर अध्यक्ष पवन बंकावार व तालुका अध्यक्ष आशिष नैताम यांनी बालमवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

रक्तदान शिबिरात युवकांनी आपली अभूतपूर्व उपस्थिती दर्शवित रक्तदान कार्यक्रमात सहभागी होत रक्तदान केले, यावेळी तब्बल 49 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 

आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राहुल बालमवार, मनवीसे चंद्रपूर तालुका अध्यक्ष विवेक धोटे, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, प्रकाश नागरकर, मयूर मंदारकर, कृष्णा गुप्ता, आकाश तिरुपतिवार, निखिल कन्नाके, रोशन भडके, राजू गेडाम, महेश नैताम, विवेक विरुटकर, सुजित परचाके आदि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!