Thursday, April 25, 2024
Homeचंद्रपूर शहरत्या 86 कामगारांना कामावर परत घ्या अन्यथा Cstps बंद पाडू - संदीप...

त्या 86 कामगारांना कामावर परत घ्या अन्यथा Cstps बंद पाडू – संदीप गिर्हे

2 डेडलाईन आंदोलन होणार की नाही?

- Advertisement -
- Advertisement -

News34

चंद्रपूर – राज्यात औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे मात्र या जिल्हयात कामगारांवर सतत अन्याय होत आहे, अशीच एक बाब चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात उघडकीस आली आहे, वर्षभरापूर्वी मोठा गाजावाजा करीत कोळशाची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी 5 किलोमीटर कन्व्हेअर बेल्ट प्रणाली प्रकल्प सुरू करण्यात आला होता.

 

मात्र हा बेल्ट वर्षभरात पूर्णतः फाटला, याचा फटका त्या बेल्ट प्रणाली मध्ये काम करणाऱ्या 86 कंत्राटी कामगारांना बसला, त्या सर्वांना न कळविता कामावरून काढून टाकण्यात आले, त्यांना कामावर परत घ्या अन्यथा 8 दिवसात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची वाहतूक व प्रवेश पूर्णतः बंद करणार असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी दिला आहे.

 

तब्बल 180 कोटी रुपये खर्च करून CHP विभागाद्वारे पाईप कन्व्हेअर बेल्ट प्रणाली प्रकल्प सुरू करण्यात आला होता, कोळशाची वाहतूक सुरळीत व जलद व्हावी व प्रदूषणाचा त्रास कमी व्हावा यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला, सदर दुरूस्ती करनाचे 16 कोटी रुपयांचे कंत्राट थायसन ग्रुप इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ने भावना एनर्जी ला पेटी कंत्राट दिले.

 

ह्या प्रकल्पामुळे अनेकांची शेती गेली त्यामधील वीज केंद्राने 86 भटाळी, पद्मापूर व स्थानिक नागरिकांना कामावर घेतले, मात्र वर्षभरात ह्या बेल्ट मध्ये मोठा बिघाड आला, कन्व्हेअर बेल्ट प्रणाली बंद करण्यात आली व कोळसा वाहतुकीचे कंत्राट दुसऱ्या कंपनीला देण्यात आल्याने कन्व्हेअर बेल्ट प्रणाली मध्ये काम करणारे 86 कामगार बेरोजगार झाले.

 

16 मार्च 2023 ला औष्णिक वीज केंद्राने कामगारांना कसलीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केले, मागील 5 ते 6 महिन्यापासून कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न भेळसावत असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.

 

कामगारांच्या बिकट प्रश्नावर शिवसेना ठाकरे गटाने आमरण उपोषण आंदोलन केले, 3 दिवसांनी आंदोलनाची दखल घेत वीज केंद्राने सदर कामगारांना लवकर कामावर समाविष्ट करू असे आश्वासन दिले मात्र महिना लोटला तरी त्या कामगारांना आजपर्यंत कामावर समाविष्ट करण्यात आले नाही.

 

कन्व्हेअर बेल्ट चे काम सुरू करण्यासाठी मुंबई कार्यालयात मंजुरी मिळण्यासाठी प्रतीक्षेत आहे अशी पळवाट अधिकारी वर्ग करीत आहे.

 

मात्र शिवसेनेने याबाबत माहिती काढली असता कन्व्हेअर बेल्ट प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव स्थानिक वीज केंद्राने वरिष्ठांना पाठविला नाही, कोळसा वाहतुकीचे कंत्राट संपुष्टात यायची अधिकारी वर्ग जाणूनबुजून वाट बघत आहे असा आरोप संदीप गिर्हे यांनी केला आहे.

 

8 दिवसांच्या आत 86 कामगारांवर वीज केंद्राने कामावर समाविष्ट केले नाही तर संपूर्ण वीज केंद्राच्या आत वाहतूक असो की कामगार कुणालाही प्रवेश करू देणार नाही याची संपूर्ण जबाबदारी वीज केंद्राची राहणार असा शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी दिला आहे.

 

याबाबत जर शिवसेनेच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर 2300 मेगावाट वीज निर्मिती प्रकल्प पुढे शिवसेना आंदोलन करणार, आंदोलन दरम्यान आम्ही एकाही कामगार व वाहतुकीला कंपनीच्या आत जाऊ देणार नाही – संदीप गिर्हे

मुख्य अभियंता कुमारवार म्हणतात की..

चंद्रपुर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता कुमारवार यांनी या संदर्भात दिव्य मराठी सोबत बोलताना माहिती दिली की पुढील 8 ते 10 दिवसात कन्व्हेअर बेल्ट चे काम सुरू होणार असून त्यानंतर त्या 86 कामगारांना कामावर रुजू करणार आहोत, याबाबत मुंबई येथील वरिष्ठ पातळीवर सूचना देण्यात आल्या आहे. त्या कामगारांवर अन्याय होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!