Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरविविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

मनोज तांबेकर यांच्या नेत्रुत्वात झालेल्या कार्यक्रमात अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी घेतला मनसेत प्रवेश

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर :-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचा दिनांक 10 सप्टेंबरला वाढदिवस मनसे कार्यकर्त्यांनी थाटात साजरा केला असतांना त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे तालुका संघटक मनोज तांबेकर यांच्या नेत्रुत्वात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश कार्यक्रम पार पडला.

 

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे.विधी विभाग जिल्हा अध्यक्ष मंजु लेडांगे जनहित कक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुढे. रमेश काळबांधे,ता, अध्यक्ष प्रकाश नागरकर विवेक घोटे करन नायर मयुर मदनकर क्रिष्णा गुप्ता प्रविन शेवते पीयूष धुपे, राज वर्मा. वर्षा भोंबले व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

 

स्थानिक विश्रामगृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश घेण्यात आला असुन चंदू भगत. रहसुद्दिन शेख. विनोद धाबेकर. नागोजी सोनवणे. रवी बावणे. दिनकर बांगडे, शेरुभाई, नमसिन भाई. ओमजी शर्मा, कवडू चिंचोलकर, दत्ता उम्बरकर, विलास दांडेकर. अर्जुन खोब्रागडे व आश्विन देठे यांचा जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी पक्षाचा दुपट्टा खांद्यावर टाकून पक्ष प्रवेश घेतला यावेळी पक्ष स्थरावर त्यातील कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular