News34 chandrapur
घुग्घूस : येथील चंद्रपूर यवतमाळ – पुणे महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर रेल्वे गेट क्रं 39 वर आर.के. मथानी या कंपनीच्या वतीने रेल्वे उड्डाणपूल निर्माणाचे कार्य अत्यंत कासवगतीने व निकृष्ट दर्जाचे शुरु असून या रस्त्यावर दररोज नागरिकांच्या होणाऱ्या अपघाताने आक्रोशीत झालेल्या घुग्गुस काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता रस्त्यावर बेशरमची झाडे लावून कंपनी विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
व यानंतर कंपनीच्या कार्यालयात कंपनी अधिकारी मनन जोशी याला घेराव घालण्यात आला संतप्त वातावरण लक्षात घेता पोलीस निरीक्षक आसिफराजा यांनी पोलीस दलासह आर.के मथानी कार्यालयात पोहचत आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
मात्र कंपनी जो पर्यंत रस्ता दुरूस्तीचे काम करीत नाही तो पर्यंत आम्ही जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यानी घेतली असता जोशी यांनी गणेशोत्सव शुरु होण्यापूर्वी रस्ता नीटनेटका करून देण्याचे आश्वासन दिल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी परतीचा मार्ग धरला
आर.के .मथानी कंपनीने सदर पूल निर्माण करण्याची मुद्दत ही एक वर्षाची असतांना दोन वर्षे लोटून ही अर्धे ही काम झालेले नाही.
राजीव रतन कडून वणी कडे जाणारे तसेच महातरदेवी कडे जाणारा रस्ता व बस स्थानकाकडे येणाऱ्या रस्त्यावर मोठं – मोठे खड्डे पडलेले असून यामध्ये दररोज दुचाकी,चारचाकी वाहन व पादचारी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
तसेच हा रस्ता पूल निर्माणा करिता बंद असल्याने स्थानिक ट्रान्सपोर्टरचे ही अतोनात नुकसान होत आहे
रस्त्यांची दुरुस्ती व पुलाचे कार्य जलदगतीने करण्यासाठी काँग्रेस तर्फे आजचा आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनात काँग्रेस जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा महिला उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद,जिल्हा महिला सचिव पुष्पा नक्षीने,जिल्हा सचिव दुर्गा पाटील, एस.सी.सेल शहर अध्यक्ष दिप्तीताई सोनटक्के, महिला सचिव मंगला बुरांडे,संध्या मंडल, सरस्वती कोवे,राधाबाई गोगला,मीना श्रीवास्तव, आईशा शेख, मीराबाई तुरणकार, राजकुमारी निषाद, प्रतिभा उईके, ज्येष्ठ काँग्रेस नेते शामराव बोबडे, शेख बाबा कुरेशी, सैय्यद अनवर, सुधाकर बांदूरकर,अलीम शेख, अनिरुद्ध आवळे,मोसीम शेख,शमीउद्दीन शेख, रोशन दंतलवार, रोहित डाकूर, विशाल मादर,युवा नेते अनुप भंडारी,विजय माटला, आकाश चिलका,अरविंद चहांदे, थॉमस अर्नाकोंडा, शहजाद शेख,अभिषेक सपडी, बालकिशन कुळसंगे, भैय्या भाई,दिपक कांबळे, सुनील पाटील, बल्ली भाई, कुमार रुद्रारप,विशाल नागपुरे, साहिल सैय्यद,नाणी मादर, नितीन मानकर, अकबर शेख,शहशाह शेख,अंकुश सपाटे,रंजित राखुंडे व मोठ्या संख्येने नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.