Thursday, May 23, 2024
Homeग्रामीण वार्तायुवक कांग्रेस अध्यक्षाने प्रशासनाला दिला आमरण उपोषणाचा इशारा

युवक कांग्रेस अध्यक्षाने प्रशासनाला दिला आमरण उपोषणाचा इशारा

कामावरून काढून टाकण्याची धमकी देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल – जी.आर. क्रिष्णा येथील ठेकेदार (व्हिनस सर्व्हिसेस) हे नेहमीच काम करणाऱ्या आपरेटर व ड्रायव्हर यांना धमकी देत असून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देत असल्याने सर्व 20 से 22 ऑपरेटर व्हिनस सर्व्हिसेस यांचेवर उपासमारीची पाळी आली असून त्यांच्या त्रासापाई वैतागले आहेत.

 

करीता त्यांचेवर त्वरित कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार यांनी एका लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार मुल यांचेकडे दिला आहे.

कंपनीच्या काम करीत असताना वाहनांना काही वेळ आराम असताना त्याच वेळेस ऑपरेटर आराम करताना अशाच वेळी ठेकेदाराने त्यांचे फोटो काढून कंपनीच्या वरिष्ठ एच आर साहेबांना पाठउन ड्युटीमद्ये गैरहजरी लावतात कंपनीमध्ये राब – राब राबवून जरा तरी जगायचे कसे हा सर्व ऑपरेटर व ड्रायव्हर बांधवांना प्रश्न निर्माण झाला आहे.

 

ते असे वागतात कि तुम्हाला आम्ही कंपनीमधुन काढुन टाकू असे एक ते दोन वेळा नसून वारंवार करतात आणि आम्हाला पक्या शिव्या देतात आम्हाला काही झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

याकरिता आपणास विनंती आहे की जी आर क्रिष्णा येथील ठेकेदार ( विनस सर्विसेस ) याध्यावर योग्य ती कारवाई करावी व ही समस्या दूर न झाल्यास आमरण उपोषणास करण्यात येईल व या मागणीसाठी आत्मदहन करण्याची परवानगी देण्यात यावी. असा इशारा भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!