माजी नगरसेविकेच्या वाढदिवशी नागरिकांना मिळाली शासकीय योजनांची माहिती

News34 chandrapur

चंद्रपूर – 7 सप्टेंबरला बालाजी मंदिर, बाबूपेठ येथे माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शासकीय योजनांची माहिती व नोंदणी शिबिर आयोजन करण्यात आले होती . 7 वेगवेगळ्या योजनाची शिबिर होती.

 

या शिबिराला भाजपा चंद्रपूर जिल्हा महानगर अध्यक्ष श्री राहुलजी पावडे, भाजपा चंद्रपूर महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भाजपा नगरसेवक श्याम कनकम , नगरसेवक प्रदिप किरमे, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य यश बांगडे प्रामूख्याने भेट दिली.

 

या शूभप्रसंगी माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले की, “वार्डातील प्रत्येक विधवा महिला, अपंग व्यक्ती, 65 वर्षपूर्ण झालेल्या आधार नसलेले जेष्ठ नागरिक, पथविक्रेते, अनाथ मूल हे सर्व नागरिक शासकीय योजनेपासून वंचित राहू नये म्हणून मी शिबिर राबवली. यात मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित दर्शविली व त्या प्रत्येक लोकांना ज्यांनी शिबिरात अर्ज केले त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देईल अशी ग्वाही दिली.

 

यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा सोशल मीडिया चंद्रपूर विधानसभा प्रमुख नंदकिशोर बगूलकर, भाजपा यूवमोर्चा जिल्हा सचिव मनिष पिपरे, सौ मंजूषा पोटदूखे, सौ नेहा नरताम, सौ निता वैरागडे, सौ अनिता चौधरी, सौ उज्वला दिघोरे, भाजपा अनूसूचित जाती बाबूपेठ मंडळ उपाध्यक्ष विवेक शिंदे, भाजपा सोशल मीडिया शक्ती केंद्र प्रमुख विनोद पेन्लीवार, राकेश सोनटक्के, प्रथम चौधरी, विशाल बनारसे,हर्षल घोटेकर, सुमित मडावी, तन्मय चव्हाण, इत्यादी व्यक्तींनी कार्य केले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!