माढेळी ते नागरी ते जिल्हा सीमा रस्त्याची स्थगिती उठवा

News34

चंद्रपूर : महाविकास आघाडी सरकारच्या काळात वरोरा – भद्रावती मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला होता. त्यावेळीच अर्थसंकल्प २०२२ मध्ये वरोरा तालुक्यातील माढेळी ते नागरी ते जिल्हा सीमा अ) रस्ता किमी ०/०० ते ५/ ०० ता. वरोरा अं. कि. ३९९ लक्ष तसेच ब) रस्ता किमी ५/ ०० ते १० / ०० ता वरोरा अं. कि. ३९९ लक्ष मजुरी प्रदान करण्यात आली होती.

 

परंतु शिंदे सरकारमध्ये यावर स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील नागरिकांची गैरसोय होत असून तात्काळ स्थगिती उठविण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.

 

वरोरा – भद्रावती मतदारसंघात ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात आहे. येथील शेतकऱ्यांना बाजारपेठेत शेतीमाल पोहचविण्याकरिता पक्के रस्ते निर्माण करण्याच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. मतदार संघात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात रस्त्याना निधी मंजूर करण्यात आला होता.

 

परंतु नवीन सरकारच्या काळात मतदार संघातील शेकडो कामांना स्थगिती देण्यात आली. त्यामुळे ही सर्व कामे रखडली आहेत. येथील नागरिकांवर हा अन्याय असून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्थगिती उठविण्याची मागणी केली आहे. त्यांची हि मागणी रास्त असून तात्काळ स्थगीती उठविण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. या कामांवरची स्थगिती उठल्यास हजारो नागरिकांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!