सहायक कामगार आयुक्त पोहचले आमदार जोरगेवार यांच्या कार्यालयात

News34

चंद्रपूर – सुरक्षा रक्षक महामंडळातील सुरक्षा रक्षकांच्या अनेक रास्त मागण्या प्रलंबित आहे. त्यांना निष्कृष्ट दर्जाचे सुरक्षा साधने दिल्या जात आहे. हा अन्याय खपवून घेतल्या जाणार नाही. सुरक्षा रक्षक महामंडळातील सुरक्षा रक्षकांच्या मागण्या प्राथमिकतेने सोडवा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी सहाय्यक कामगार आयुक्त एम. पी मडावी यांना दिले आहे.

 

सुरक्षा रक्षक महामंडळातील सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांसह सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सदर निर्देश दिले आहे. या बैठकीला सहाय्यक कामगार आयुक्त एम. पी मडावी, माथाडी बोर्ड क्लर्क चे संतोष नवाते, लेखापाल रवींद्र चाहारे, यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, आनंद रणशूर, नितेश गवळी सुरक्षा महामंडळातील कामगार संतोष कटरे, संजय क्षिरसागर, मारोती रतनकर, सचिन करमरकर, समीर काजी यांच्यासह इतर कामगारांची उपस्थिती होती.

 

सुरक्षा रक्षक महामंडळातील नोंदणीकृत कामगारांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. त्यामुळे या कामगारांमध्ये रोष निर्माण झाला आहे. गार्ड बोर्ड नियमानूसार उत्तम दर्जाचे सुरक्षा साधने त्यांना दिल्या जात नसल्याचा आरोप कामगारांनी केला.

 

सुरक्षा रक्षक हे जबाबदारी चे काम आहे. त्यामुळे त्यांना उत्तम दर्जाचे सुरक्षा साधने उपलब्ध करुन देणे ही महामंडळची जबाबदारी आहे. त्यांना नियमानुसार मिळणार असलेले सर्व सुरक्षा व गरजेची साधने आपण तात्काळ उपलब्ध करुन द्यावीत, सदर साहित्यांचा दर्जा गार्ड बोर्डाने निर्धारित केलेल्या निकषानुसार असला पाहिजे अशा सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सहाय्यक कामगार आयुक्त एम. पी मडावी यांना केल्या आहे.

 

सदर सुरक्षा रक्षकांना सुरक्षा महामंडळात नोंदणी झालेल्या कामगारांना नोंदनीची पावती देण्यात आलेली नाही. सदर पावती त्यांना उपलब्ध करुन देण्यात यावी, कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना उपचारा करिता रुग्णालये निर्धारीत करुन देण्यात यावी, प्रत्येक कामगाराला स्वतंत्र वेतन पावती देण्यात यावी, गार्ड बोर्डाच्या नियमानूसार प्रत्येक वर्षी त्यांना गणवेश व इतर सुरक्षा साधने देण्यात यावी आदी सूचना यावेळी त्यांनी केल्या आहे. कामगार हा प्रमूख घटक आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नका त्यांच्या मागण्यांकडे विषेश लक्ष देत त्या सोडविल्या जाव्यात अशा सुचनाही त्यांनी यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त यांना केल्या आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!