Sunday, April 21, 2024
Homeक्रीडाअखेर रवींद्र टोंगे यांचं उपोषण मागे

अखेर रवींद्र टोंगे यांचं उपोषण मागे

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – मागील 20 दिवसापासून सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत त्यांच्या विविध मागण्या मान्य करीत आंदोलनाची सांगता केली. 55 इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 30 हजार रुपयात

मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी मागील 20 दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर 29 सप्टेंबर रोजी तोडगा निघाला.

 

मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या तत्वतः मान्य करण्याचे आश्वासन दिले तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिल्यामुळे ओबीसींचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 दिवसापासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले. Samsung कंपनीचा 5 स्टार वॉशिंग मशीन अवघ्या 28 हजार 490 रुपयात, आजच खरेदी करा

 

शनिवार सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मंडपाला भेट देत उपोषणकर्ते रवींद्र टोंगे, विजय बल्की व प्रेमानंद जोगी यांचे उपोषण पाणी पाजून सोडविले. त्यानंतर अधिकृतपणे आंदोलन स्थगित केल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जाहीर करण्यात आले.

 

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली की भाजप सरकारच्या कार्यकाळात मी मुख्यमंत्री असताना ओबीसी समाजाच्या हितासाठी तब्बल 26 शासन निर्णय काढले होते, आज राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी समाज उभा आहे, मात्र आरक्षण मुद्द्यावर दोन्ही समाजात तेढ निर्माण होऊ देणार नाही अशी सरकारची भूमिका आहे.

 

सह्यादी अतिथीगृहात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ओबीसी समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली, झालेली बैठक ही रेकॉर्डवर आहे, आम्ही ओबीसी संघाला शब्द दिला आहे, शब्द पाळला नाही अशी वेळ आम्ही येऊ देणार नाही, जातनिहाय जनगणना बाबत बिहार ने पाऊल उचलले असले तरी त्यानंतर त्याचा काय परिणाम येतो ते बघून आपण राज्यात जातनिहाय जनगणनेबाबत काय करता येईल त्यावर नक्की सकारात्मक राहू असे फडणवीस यांनी आश्वाशीत केले.
ओबीसी समाजातील काही मागण्या आम्ही विसरलो किंवा आपल्याला काही सांगायचं असेल तर नक्की आम्हाला कळवा, त्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा होणार.

 

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ओबीसी अन्नत्याग आंदोलनाला भेट देत आपली शिष्टाई दाखविली, त्यांनतर सरकार व ओबीसी संघटनांची बैठक घडवून आणण्यात मुख्य भूमिका मुनगंटीवार यांनी बजावली.

 

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी रविंद्र टोंगे यांचं अन्नत्याग आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार व आमदार किर्तीकुमार भांगडीया, परिणय फुके, सचिन राजूरकर, दिनेश चोखारे, पप्पू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!