व्हिडीओ गेम पार्लर बाबत धक्कादायक माहिती

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर बाबत News34 वर बातमी प्रकाशित होताच पोलीस व जिल्हा प्रशासन खळबळून जागे होताच कारवाईचा धडाका सुरू झाला.

 

आता या व्हिडीओ गेम पार्लर ची जिल्हा प्रशासनाने परवाना तपासणी मोहीम सुरू केली आहे.
मात्र आधीच परवाने नूतनीकरण करण्यात आले नसल्याने प्रशासनाच्या मोहिमेचा अर्थ काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे.

 

 

या पार्लर बाबत News34 ला धक्कादायक माहिती मिळाली आहे, शहरातील काही व्हिडीओ गेम पार्लर मध्ये पोकर च्या मशीन लावण्यात आल्या होत्या, विशेष म्हणजे पोकर च्या मशीन फक्त केसिनो मध्ये लावण्यात येतात.

पोकर मशीन म्हणजे काय?

मोठ्या केसिनो मध्ये लावण्यात येणाऱ्या जुगाराच्या मशीनला पोकर म्हणतात याचा दुसरा अर्थ हा डाकू होतो, म्हणजेच खेळणाऱ्यांच्या खिश्यावर दरोडा टाकण्याचे काम या मशीन द्वारे केल्या जाते.

वर्ष 2022 डिसेंम्बर पासून जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर संचालकांच्या परवान्यांचे अद्यापही नूतनीकरण करण्यात आले नाही, मात्र पार्लर संचालक प्रशासनाला आमचं काम हे नियमाप्रमाणे असल्याचे ओरबाडून सांगत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत सुरू करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेबाबत अद्यापही जिल्हाधिकारी यांचं ते पत्र पोलीस निरीक्षकांना प्राप्त झाले नाही.

शासनाने सुरू केलेल्या मोहिमेआधी खिसा खाली करणाऱ्या या मशीन पार्लर चालक तर्फे मशीन काढण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेम पार्लर बाबत बातमी नंतर अनेकांनी आपण या पार्लर मध्ये जाऊन पैश्याचा जुगार खेळत पैसे हरल्याची खंत व्यक्त केली आहे.

 

विशेष म्हणजे अनेक युवकांनी गेम च्या नावावर पोकर म्हणजे पैश्याचा जुगार खेळला, पार्लर चालकांनी मशीन सेट करीत अनेकांची फसवणूक केली अशी माहिती सुद्धा News34 च्या हाती लागली आहे.

विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ष 2002 पासून व्हिडीओ गेम पार्लर बाबत जी अधिसूचना काढण्यात आली होती, त्यानंतर आजपर्यंत त्या अधिसूचनेत काही सुधारणा झाली नाही.

 

जिल्हाधिकारी गौडा यांनी आधी व्हिडीओ गेम पार्लर ला सील मारून तपासणीचे आदेश द्यायला हवे होते मात्र तसे काही झाले नाही, जर असे झाले असते तर व्हिडीओ गेम पार्लर संचालक सेटिंग केलेली मशीन काढू शकले नसते.

राज्याच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जुगार बाबत कायदे कठोर करणार असल्याची घोषणा असली तरी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर सुरू आहे, बल्लारपूर पोलीस व्हिडीओ पार्लर च्या नावाखाली सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर धाड मारण्याचे धाडस करणार काय?

नुकत्याच वर्ष 2023 मध्ये जून महिन्यात खापरखेडा पोलिसांनी व्हिडीओ गेम पार्लर मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाडी मारल्या होत्या, या धाडीत तब्बल 88 मशीन सहित तब्बल 26 जणांना अटक करीत 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता, मात्र चंद्रपुरात अशी कारवाई कुठे होताना दिसत नाही.

पोलीस व जिल्हा प्रशासन नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर वर कारवाई करीत नसल्याने पार्लर चालकांच्या हिंमती वाढल्या आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!