गोलबाजार हत्या प्रकरणातील आरोपीला अवघ्या 3 तासात अटक

News34

चंद्रपूर – 3 सप्टेंबर ला सकाळी 7 वाजताच्या सुमारास शहरातील गोलबाजार परिसरात 65 वर्षीय मधुकर मंदेवार यांचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली.

विठ्ठल मंदिर भागात राहणारा मृतक मधुकर हा भिख मागायचा, गोल बाजार परिसरात त्याची ओळख नामदेव म्हणून होती.

शनिवारी रात्री तो गोलबाजार येथील भाजी मार्केट परिसरात झोपी गेला मध्यरात्री नंतर अज्ञात इसमाने त्याच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करीत हत्या केली.

सकाळी रक्ताच्या थारोळ्यात मधुकर चा मृतदेह नागरिकांना आढळल्यावर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत हे ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते.

त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार आपल्या चमुसहित गोलबाजार परिसरात दाखल झाले.

एका भिखाऱ्याची हत्या कोण कशाला करणार? याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीची ओळख पटली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने आरोपी 43 वर्षीय अजय शालीकराम याला अवघ्या 3 तासात अंचलेश्वर गेट परिसरातून अटक केली.

आरोपी आपल्याचं धुंदीत…

स्थानिक गुन्हे शाखेने चौकशी केल्यावर आरोपीला शहर पोलीस ठाण्यात आणले, त्यानंतर अधिक चौकशी केली असता आरोपी अजय ने पोलिसांसमोर गुन्हा कबूल करीत पैसे जवळ नसल्याने लुटमारी करण्याच्या उद्देशाने तो गोल बाजारातील भाजी मार्केट परिसरात गेला, तिथे कुणी न आढळल्याने मधुकर त्याठिकाणी झोपलेल्या अवस्थेत होता, अजय ने मधुकर ची झडती घेत पैसे लुटण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांची यावेळी चांगलीच झटापट झाली, अखेर आरोपीने तीक्ष्ण हत्याराने मधुकर च्या गळ्यावर वार करत तिथून पळ काढला.

विशेष बाब म्हणजे आरोपीला ताब्यात घेतल्यावर तो पोलिसांसमोर रक्षाबंधनाच गाणं म्हणत होता.

आरोपी अजय शालीकराम कोण?

आरोपी अजय शालीकराम यांच्यावर दुचाकी वाहन चोरीचे तब्बल 5 गुन्हे दाखल आहे, 2 दिवसांपूर्वी तो कारागृहातून सुटून आला होता, सुटून आल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याने हत्येसारखा गंभीर गुन्हा केला, त्यावेळी तो नशेत होता अशी माहिती आहे.

या संपूर्ण गुन्ह्याचा अतिशय जिकरीने तपास करीत गुन्हा उघडकीस आल्यानंतर अवघ्या 3 तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली.

सदर हत्येच्या तपासात अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपुत यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!