Saturday, September 23, 2023
Homeचंद्रपूरअमृत योजनेचे काम पूर्ण करा अन्यथा.....आप पार्टीचा इशारा

अमृत योजनेचे काम पूर्ण करा अन्यथा…..आप पार्टीचा इशारा

पालिकेला 1 महिन्याचा वेळ अन्यथा आंदोलन करू - राजू कुडे

- Advertisement -
- Advertisement -

News34 Aap Party

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. प्रभागातील डॉ. आंबेडकर नगर आणि बाबुपेठ या दोन भागातील नागरिकांना अजूनही पाणीपुरवठा होत नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

आम आदमी पार्टीचे शहर सचिव राजू कुडे यांनी सांगितले की, “बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम 2017 मध्ये सुरू झाले होते. त्यानुसार 2019 पर्यंत काम पूर्ण करावे लागते होते. मात्र, 2023 हे वर्ष संपत असतानाही अद्यापही काम पूर्ण झालेले नाही.

यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कंत्राटदाराकडून कामात लापरवाई केली जात आहे. कामाची गुणवत्ताही चांगली नाही. अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे. यामुळे रस्ते खराब झाले आहेत. यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
यासंदर्भात महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले.

यावेळी आम आदमी पार्टीचे नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, युवा अध्यक्ष संतोष बोपचे, उपाध्यक्ष सुनील सतभय्या तब्बसुम शेख, सुधीर पाटील अनुप तेलतुंबडे, डॉ. देवेंद्र अहेर, जयदेव देवगडे, अजय बाथव, भिमराज बागेसर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

“आम्ही मनपा प्रशासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम देत आहोत. जर एक महिन्यात काम पूर्ण झाले नाही तर आम आदमी पार्टीकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
– राजू कुडे, शहर सचिव

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..