ओबीसी आंदोलन आता राज्य सरकारला शेवटचा इशारा

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपुरात ओबीसीच्या न्यायिक मागण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे अन्नत्याग आंदोलनाचा 11वा दिवस असून टोंगे यांची प्रकृती चिंताजंक स्थितीत आहे तरीही शासनाने याकडे पाठ फिरवित ओबीसीच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

 

ओबीसी समाजाच्या मागणीनुसार राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाबाबत जी घोषणा झाली त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, जातनिहाय जनगणना करावी, स्वाधार योजना लागू करावी अश्या विविध मागण्या घेऊन टोंगे यांनी आमरण उपोषणाला बसले आहे.

 

टोंगे यांच्या समर्थनार्थ ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यासाठी “भीक द्या भीक द्या… सरकार ला भीक द्या…” मागणी करत भीक मांगो सत्याग्रह गांधी चौकते गोल बाजार येथे ओबीसी, व्हीजे एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी 72ओबीसी वसतिगृह,आधार योजना, विदेश शिष्यवृत्ती या मागण्यांसाठी दिनांक 21 सप्टेंबर, ओबीसी सेवा संघ,चंद्रपूर तर्फे मुसळधार पावसात भीक मांगो सत्याग्रह करण्यात आले.मागील 6 वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या 72 वसतीगृहाचा विषय शासनाने अजूनही सोडवला नाही.

 

राज्य शासनाचा वित्त विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग गंभीर नाही. यामुळे ओबीसी विद्यार्थी वसतिगृहे आणि आधार योजनेपासून वंचित आहेत. अनेक विदयार्थ्यांनी वसतिगृह सुरु होतील या आशेने जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश घेतला आहे.मात्र अजूनही वसतिगृह सुरु झाले नाही.

 

चालढकल करत शासन ओबीसी समाजावर अन्याय करत आहे.52% च्या वर असलेल्या कष्टकरी ,अन्नदाता समाजाची शासनाला पर्वा नाही.शासनाकडे ओबीसी विद्यार्थ्यांच्या हितासाठी निधी नाही.त्यामुळे या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी भीक मांगो सत्याग्रह च्या माध्यमातून सरकार साठी भीक मागितली व मिळालेली भीक सरकारला पाठविण्यात आली.

 

याची दखल घेऊन सरकारने न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल डहाके यांनी दिला. यावेळी ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके,जिल्हामहासचिव ऍड.विलास माथनकर,भाविक येरगुडे,,मनीषा बोबडे ,प्रलय म्हशाखेत्री,अक्षय येरगुडे,गीतेश शेंडे उपस्थित होते.

 

सरकार जाणीवपूर्वक ओबीसी विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या मान्य करत नाही.ओबीसी विदयार्थ्यांच्या योजनेसाठी सरकारकडे निधी नाही.आमच्या न्याय मागण्या मान्य झाल्या नाहीत त्यामुळे तीव्र आंदोलन करत आज टोंगे यांच्या उपोषण स्थळी ओबीसी युवकांनी समर्थ संकल्पनेतून मुंडण आंदोलन करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मागास वर्गीय बहुजन कल्याण मंत्री यांचा निषेध व्यक्त करत महेश खंगार, अंबादास वनकर, संदीप तोडसाम, दिलीप डोंगरे, कृष्णा चांदेकर, संतोष कुकडकर यांनी स्वतः चे मुंडण करत निषेध व्यक्त केला.स्थळी विनायक बांगडे, नंदू नागरकर, सुभाष गौर,राजेश बेले, देवा पाचभाई, सुनीता लोढिया,ऍड. वैशाली टोंगे, विजय फाले उपस्थित होते.

 

अन्नत्याग उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती चिंताजनक असून शासनाने ओबीसी युवकाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा याचे गंभीर परिणाम उमटतील -सचिन राजूरकर, महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ

 

ओबीसी संघटनांची उद्या महत्वपूर्ण बैठक

राज्य सरकारला देणार अखेरचा इशारा

राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांचे ओबीसींच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाला अकरा दिवस पूर्ण झाले. मात्र महाराष्ट्र शासनाने आंदोलनाबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आता शासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला असुन याबाबत दिनांक 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघ , सर्व ओबीसी संघटना , सर्व जातीय संघटनाच्या सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे.

 

चंद्रपूरच्या ताडोबा मार्गावरील तुकुम येथील मातोश्री सभागृहामध्ये दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील सर्व ओबीसी बंधू-भगिनींनी, ओबीसीतील विविध जातींच्या संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यातील ओबीसी बांधवांमध्ये संतापाची भावना निर्माण झालेली आहे. शासनाने ओबीसींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यासाठी अखेरचा इशारा देण्याचे हेतुने या बैठकीच्या आयोजन करण्यात आलेआहे , तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!