Tuesday, December 5, 2023
Homeगुन्हेगारीचंद्रपूर शहराच्या मध्यभागी सुरू असलेल्या देहव्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

चंद्रपूर शहराच्या मध्यभागी सुरू असलेल्या देहव्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश

निशा अपार्टमेंट मध्ये सुरू होता देहव्यापार

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर शहरात सध्या अवैध धंदे वाढत आहे, जुगार असो की सट्टा आता चक्क शहराच्या मध्यभागात देहव्यवसायाचे जाळे पसरत आहे, अश्यातच रामनगर पोलिसांनी आपल्या हद्दीत सुरू असलेल्या देह व्यापाराचे घबाड उघडकीस आणले.

 

मुखबिर मार्फत मिळालेल्या माहितीनुसार रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले निशा अपार्टमेंट मध्ये एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी इतर महिलांना सुद्धा पैश्याचे प्रलोभन देत त्यांच्याकडून देहविक्री करून घेत होती.

 

सोबतच या कामात आरोपी महिलेने आपल्या फ्लॅट मधील रूम चा वापर देह व्यवसाय साठी करीत होती, रामनगर पोलिसांनी मारलेल्या धाडीत हे सर्व घबाड उघडकीस आले.

 

रामनगर पोलिसांनी या देहव्यापर चालविणाऱ्या महिलेवर कलम 3, 4, 5, व 7 अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

 

देहविक्री करणाऱ्या 3 महिलांना स्त्री आधार केंद्र मूल रोड चंद्रपूर मध्ये ताब्यात देत 2 महिलांना अटक करण्यात आली.

 

सदर गुन्ह्याची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पोलीस निरीक्षक लता वाढीवे व गुन्हे शोध पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे व पोउपनी मधुकर सामलवार सह पोलीस कर्मचारी यांनी केली.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular