चंद्रपुरातील वरोरा नाका ब्रिजवर युवकांचा धिंगाणा

News34 chandrapur

चंद्रपूर – शहरात ओव्हर स्पीड वाहनांच्या थरार बाबत ऑगस्ट महिन्यात News34 ने बातमी प्रकाशित केली होती मात्र त्याकडे वाहतूक नियंत्रक शाखेने दुर्लक्ष केले, मात्र शहरात आता दुचाकी सह चारचाकी वाहनाचा 21 सप्टेंबर ला रात्री 12 वाजताच्या सुमारास ओवरस्पीड थरार बघायला मिळाला.

 

गुरुवार 21 सप्टेंबरला रात्री 12 वाजताच्या सुमारास चारचाकी वाहन क्रमांक MH34BB1100 हे वेगाने रामनगर पोलीस स्टेशन कडून वरोरा नाका उड्डाणपूलावर (बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल) आले, उड्डाणपूल वरील आंबेडकर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या वळणावर या वाहनाने वेगात वळण्याचा प्रयत्न केला असता चालकाचे वाहनवरून नियंत्रण सुटले, आणि सदर चारचाकी वाहन तब्बल 3 वेळा पलटी खात पुलावर कोसळले.

 

या वाहनात 3 युवक असल्याची माहिती आहे, विशेष म्हणजे रात्रीची वेळ असल्याने काही युवक व नागरिक पुलाच्या त्या भागावर फिरायला येत होते, त्याचवेळी हे वाहन अतिवेगात वळण घेत असताना पलटी झाले सुदैवाने नागरिक वेळीच सावध झाल्याने जीवितहानी झाली नाही.

 

चंद्रपूर शहरात अनेक अल्पवयीन मुले आपली दुचाकी अशीचं अतिवेगात चालवीत दुसऱ्यांना नुकसान पोहचणार असे कृत्य करतात मात्र आता चारचाकी वाहन धारक सुद्धा चित्रपटाप्रमाणे आपण हिरो असल्यासारखे दर्शवित वाहन अतिवेगात चालविण्याचे प्रकार करीत आहे.

 

अपघातानंतर काही युवकांनी तात्काळ वाहनाकडे धाव घेत त्या 3 युवकांना बाहेर काढले, ते युवक किरकोळ जखमी झाले अशी माहिती आहे.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!