Thursday, May 16, 2024
Homeचंद्रपूर शहरशरद पवार व अजित पवार यांच्या वादात चंद्रपुरातील या नेत्याने घेतला हा...

शरद पवार व अजित पवार यांच्या वादात चंद्रपुरातील या नेत्याने घेतला हा निर्णय

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे उपाध्यक्ष त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वादाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला.

 

आम आदमी पार्टीचे राज्य संगठन सचिव भूषणजी ढाकुलकर, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या उपस्थितीत सरदार यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावेळी ढाकुलकर यांनी सरदार यांच्या पक्ष प्रवेशाचे स्वागत केले.

 

सरदार यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून त्यांना आता पुढे जाणे शक्य नव्हते. आम आदमी पार्टीची विचारसरणी त्यांना आवडते आणि त्यांना पक्षाच्या माध्यमातून लोकांसाठी काम करण्याची संधी मिळेल अशी त्यांना आशा आहे.त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांचे पक्ष प्रवेशामुळे जिल्हातील राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे उपाध्यक्ष त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांनी आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव भूषणजी ढाकूलकर तथा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या उपस्थितीत सरदार यांनी आम आदमी पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले.

 

सरदार यांनी आपल्या प्रवेशाच्या भाषणात सांगितले की, ते शरद पवार-अजित पवार यांच्यातील वादाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत आहेत. त्यांनी सांगितले की, आम आदमी पार्टी एक नवीन आणि आशादायी पर्याय आहे.

सरदार यांच्या प्रवेशाने आम आदमी पार्टीला मोठा दिलासा मिळाला आहे.

 

सरदार हे जिल्ह्यातील एक प्रभावी नेते आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे आम आदमी पार्टीला जिल्ह्यात यश मिळण्याची शक्यता आहे. त्रीलोचनसिंग अरोरा (शंकर सरदार) यांच्या पक्षप्रवेशा वेळेस महानगर अध्यक्ष योगेश गोखरे जिल्हा सचिव संतोष दोरखंडे जिल्हा शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक बेरशेट्टीवार, महानगर सचिव राजू कुडे, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभैय्या, महानगर सह संघटन मंत्री सिकंद सागोरे, महानगर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, महानगर सहसचिव सुधीर पाटील, तब्बसूम शेख, पवन कुमार, जितेंद्र कुमार भाटिया व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!