Video game चंद्रपूर – तीन पत्ती जुगारानंतर आता व्हिडीओ गेम पार्लर चा नवा जुगार जिल्ह्यात सुरू झाला आहे, पण हा जुगार शासनाची नजर चुकवून होत आहे.
अनेक वर्षांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने नूतनीकरण करण्यात आले नव्हते, त्यांनतर व्हिडीओ गेम पार्लर चालक न्यायालयात गेले, काही वर्षांनी हा मुद्दा राज्यातील गृह मंत्रालयात गेले त्यानंतर पार्लर संचालकांच्या बाजूने निर्णय लागला, परवाने नूतनीकरण करण्यात आले.
सध्या चंद्रपूर व बल्लारपूर शहरात तब्बल 25 व्हिडीओ गेम पार्लर सुरू आहे, पण यावर नियंत्रण करण्याचे काम हे पोलिसांकडे आहे.
व्हिडीओ गेम पार्लर अधिकृत आहे काय?
अनेक नागरिक या गेम पार्लरवर पैसे हरल्यावर म्हणतात की मशीन मध्ये सेटिंग आहे, मात्र यामागे काय गुपित आहे हे याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे.
Video game याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे केले असता त्यांनी सांगितले की काही वर्षांपूर्वी चंद्रपुरातील व्हिडीओ पार्लर च्या परवाना बाबत अडचणी पुढे आल्या होत्या मात्र त्यानंतर सदर प्रकरण गृह मंत्रालयात गेले, व निकाल व्हिडीओ पार्लर संचालकांच्या बाजूने लागला.
सध्या बल्लारपूर व चंद्रपुरात 25 व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने नूतनीकरण करण्यात आलेले आहे, परवान्यात कमीतकमी 10 मशीन ची परवानगी मिळते, यावर पाहिजे असेल तर तसा अर्ज करावा लागतो.
Video game परवाना साठी अर्ज आला की त्याबाबत सर्व कागदपत्रांची पडताळणी करीत परवाना दिला जातो, परवान्यात नमूद असलेल्या मशीन पैकी आगाऊ मशीन पार्लर संचालकांने लावल्या तर त्यावर कारवाई करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे.
व्हिडीओ गेम पार्लर च्या मशीन मध्ये गडबड असते का?
अनेक नागरिकांची ही तक्रार आहे, मशीन मध्ये सेट करून खेळणारा पैसे हरतो पण जिंकत नाही, याबाबत सत्य फक्त त्या मशीनची तंत्रज्ञान विशेषज्ञ सांगू शकतो.
सध्या हा सुद्धा जुगाराचा प्रकार बनला आहे, चंद्रपुरातील अनेक युवक या जुगाराला बळी पडत आहे, शहरात अनेक राजकीय पुढाऱ्यांनी व्हिडीओ गेम पार्लर सुरू केले आहे, चंद्रपूर पोलिसांनी जर त्यांचा परवाना व मशीन मध्ये केलेली गडबडी शोधून काढली तर पार्लर घोटाळा बाहेर पडणार, मात्र यावर अजूनही पोलीस विभाग मार्फत ठोस कारवाई झाली नाही.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी परवान्यात असलेल्या मशीन ची मंजुरी व पार्लर मध्ये असलेल्या मशीन ची पडताळणी केली असता आगाऊ मशीन पोलिसांना त्याठिकाणी दिसल्या पोलिसांनी तात्काळ आगाऊ मशिन जप्त करीत कारवाई केली.
चंद्रपूर शहर पोलिसांच्या हद्दीत असलेल्या व्हिडीओ गेम पार्लर च्या बाबतीत पोलीस प्रशासनाने धडक मोहीम राबवली तर मशीनमध्ये काय गडबड केल्या गेली आहे हे पुढे येईलचं.
आधी पैसे देत आपल्याला कॉइन दिल्या जात आहे, ते कॉइन टाकून खेळणारा पैसे हरत आहे, पार्लर च्या मशिनी सध्या पॉकेटमार सारखी काम करीत आहे, यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी अनेक नागरिकांची मागणी आहे.
नियम काय सांगतात?
दोन दुकानांमध्ये 75 मीटर अंतर असावे, परवानगी च्या अधीन राहून व्हिडीओ गेम मशीन लावाव्या लागतात, प्रत्येक दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य आहे. पोकर मशीन लावण्यास सक्त मनाई आहे.
दर महिन्याला याबाबत संबंधित अधिकारी व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना चौकशी करावी लागते. मात्र चंद्रपुरात तसे काही होताना दिसत नाही, नियमांना डावलून दुकाने सुरू आहे, यावर जिल्हा व पोलीस प्रशासनाने ठोस कारवाई करायला हवी.