Thursday, April 25, 2024
Homeचंद्रपूर शहरचंद्रपुरात आम आदमी पक्षाला खिंडार

चंद्रपुरात आम आदमी पक्षाला खिंडार

आप च्या महिला अध्यक्ष सहित कार्यकर्त्यांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आजही निवडणूक आयोगाने घोषित केल्या नसल्या तरी पुढची निवडणूक सर्व पक्षांना महत्वाची असल्याने सध्या पक्षबांधणीचे काम विविध पक्षांनी सुरू केले आहे.

चंद्रपुरात आम आदमी पक्षाने अनेक ठिकाणी कार्यकर्ते जमविले असून आधीचा पक्ष व आताचा आम आदमी पक्ष यामध्ये मोठा फरक जाणवतो, मात्र आता आम आदमी पक्षाला सुद्धा चंद्रपुरात मोठं खिंडार पडलं आहे.

 

चंद्रपूर आम आदमी महिला अध्यक्ष ऍड. सुनीता पाटील यांनी कार्यकर्त्यांसाहित कांग्रेस पक्षात प्रवेश केला.

आप पक्षात महिलांच्या संघटन उभारणी मध्ये सुनीता पाटील यांचा मोठा वाटा होता.

 

रविवारी विश्रामगृह चंद्रपूर येथे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनीता पाटील यांनी कांग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला.

 

यावेळी आप च्या महिला उपाध्यक्ष जासमिन शेख, रूपा काटकर, मीना पोटफोडे, महिला सचिव वंदना कुंदावार, सहसचिव सुभद्रा मुन, शबनम शेख, स्वाती डोंगरे, सुहास रामटेके, स्नेहा महाकश्यप, पुष्पा बुधवारे, संतोषी यादव, भीमराव मेंढे, अभिजित संगेवार, सुशील वाहुले, लक्ष्मण पाटील, मुकेश पांडे, रज्जू भैया, अकीब शेख, अमजद खान, नंदकिशोर स्वान, प्रशांत रामटेके, कविता टिपले आदि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!