News34 chandrapur
चंद्रपूर – श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री माता महाकाली महोत्सवात 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि कन्याभोजन कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्व शक्तीरुपी कन्यांचे मान्यवरांच्या हस्ते कन्यांचे पूजन झाले. तर कार्यक्रमाच्या तिस-या दिवशी प्रसिध्द गायिका वैशाली सामंत यांच्या गीत गायनाच्या कार्यक्रमाने महोत्सवात रंगत भरली.
श्री माता महाकाली महोत्सव धार्मिक व उत्साही वातावरणात पार पडत आहे. महोत्सवाच्या तिस-या दिवशी रात्री आठ वाजता प्रसिध्द गायिका वैशाली सामंत यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या गायन कार्यक्रमाने महोत्सवात रंगत भरली. यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, सचिव अजय जयस्वाल, सदस्य बलराम डोडाणी, मिलिंद गंपावार यांच्यासह ईतर पदाधिका-यांनी वैशाली सावंत यांना मातेची मुर्ती देत सन्मानीत केले. माता महाकाली महोत्सव हा नारीशक्तीचा जागर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम आहे. यात चंद्रपूरकरांचा लाभत असलेला सहभाग कौतुकास्पद आहे. दरवर्षी आपण हे आयोजन करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
माता महाकाली महोत्सवात जिल्हाभरातील 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि भोजन कार्यक्रम घेण्यात आला. यात विविध शाळेतील विद्यार्थींनीही सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी महाकाली मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी कन्यापूजनानंतर शक्तीरुपी कन्यांना महोत्सव समीतीच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. या आयोजनात सहकार्य करणा-या पालकांनाचेही समीतीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. काल महोत्सवाच्या तिस-या दिवशी विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि मनसे राजु उभंरकर यांनी महोत्सवाला भेट देत शुभेच्छा दिल्यात यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने मातेची मुर्ती देत त्यांचा सत्कार करण्यात आला.
चंद्रपूरच्या युवकांनी बनवलेली हायड्रोजन कार ठरतेय आकर्षण
चंद्रपूरातील कौशल समोर यावे या हेतुने चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील युवकांनी बनविलेली हायड्रोजन कार श्री माता महाकाली महोत्सव मध्ये ठेवण्यात आली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी या कारची पाहणी करुन कार तयार करणा-या सर्व टिमचा सत्कार केला आहे.
महोत्सवात आयोजित आरोग्य शिबिरात हजारो लोकांची तपासणी
श्री माता महाकाली महोत्सव येथे डॉ. आसावरी देवतळे यांनी आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचा हजाराहुन अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे. यात तपासणी नंतर औषधोपचारही केल्या जात आहे.
उद्या निघणार मातेची भव्य नगर प्रदक्षिणा पालखी यात्रा
उद्या निघाणा-या नगर प्रदक्षिणा पालखी यात्रेने पाच दिवसीय महोत्सवाचा समारोप होणार आहे. हळदी कुंकुवाचा सडा टाकून पालखीचा मार्ग स्वच्छ केला जाणार आहे. या पालखी यात्रेत मंदिर अब बनने लगा है या गाण्याची सुप्रसिध्द गायीका ईशरत जॅहा यांचा रोड शो असणार आहे. सोबतच यात केदारनाथ धाम येथील झांज व डमरु पथक, पवनसुत हनुमान व वानरसेना, कानपूर येथील शिवतांडव व अघोरी नृत्य, उत्तर प्रदेश राज्यातील काली माता दृष्य, आदिवासी नृत्य, गंगा आरती, पालखीत तुतारी व अब्दारीचा समावेश, पालखीत पोतराजे नृत्य यांचा समावेश,चंद्रपूर शहरातील ८० वादकांचा जगदंब व अन्य ढोल ताशा व ध्वज पथकांचा समावेश, शहरातील बँड पथकांचा समावेश, पालखीत गायत्री मंदिर परिवारातील ५०० कलशधारी महिलांचा समावेश, पालखीत ५०० महिला व पुरुषांचे लेझीम पथक, डी. जे. धुमालचे विविध संच, शाळा, कॉलेज मधील विद्यार्थी- विद्याथ्र्याचे दृष्य समूह, डी. जे. चे विविध संच, महिला, पुरुषांचे दांडिया गरबा नृत्य समूह, १००९ महिला – पुरुषांचे योग नृत्य, १५१ मंडळांचे महिला – पुरुषांचे भजन समूह, नागपूर येथील विरांगण क्रीडा गृपच्या मुलांचे शस्त्र प्रात्यक्षिक, शहरातील अनेक सामाजिक संघटनांचा पालखीत सहभाग, शहरातील व्यायाम शाळांचा पालखीत सहभाग, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित दृष्य समूह, चंद्रपूर जिल्ह्यातील देवी – देवतांच्या मंदिरांचे दृष्य, श्री माता निर्मला परमेश्वरी भक्तांचा पालखीत समावेश,पारंपरिक खेळांचे पालखीत दृष्य, तेलगु समाजाचे बतुकम्मा दृष्य, पारंपारिक सण उत्सवांचे बोलके दृष्य, शहारातील तंट्या बिल व वाघोबांचा समावेश, मशाल पथक यांचा पालखीत समावेश, टांगता रोप मल्लखांब प्रात्यक्षिक समूह, चंद्रपूर यांचा पालखीत समावेश, स्थिर मल्लखांब प्रात्यक्षिक समूह, जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्था, पंढरपूर यांचे १०८ वारकरी टाळ, मृदुंग, गर्जना समुह,स्वच्छता समूह यांचा पालखीत समावेश,बंगाली समाजातील महिलांद्वारा शंखनाद व पुरुषांद्वारा डंकनाद आदींचा समावेश असणार आहे.