रविंद्र शिंदेचे कार्य समजले आणि आशेचा किरण गवसला

News34 chandrapur

भद्रावती : तालुक्यातील खापरी येथील वैष्णवी सुनील पाचभाई ह्या नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थींनीला तिचे प्रथम वर्षाचे प्रवेश शुल्क भरण्याची व्यवस्था शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी सामाजिक बांधिलकीतून केली. रविंद्र शिंदे यांनी प्रसंगावधान ठेवीत केलेल्या सहकार्यामुळे वैष्णवीच्या चेहऱ्यावर अप्रतीम हास्य फूलले.

 

दि. २२ ऑक्टोंबर रोजी वैष्णवीच्या आईवडीलांनी रविंद्र शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी भद्रावती विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष विश्वास कोंगरे व युवा सामाजिक कार्यकर्ते उमेश काकडे प्रामुख्याने उपस्थित होते.
लेकीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रविंद्र शिंदे यांच्या रूपाने आमच्या मदतीला देवदुतच धावून आले. कदाचित त्यांनी वैष्णवीचे प्रवेश शुल्क भरण्याची व्यवस्था केली नसती ,तर आमच्या वैष्णवीचा प्रवेश या वर्षी झाला नसता. तिचे एक वर्ष वाया गेले असते. रविंद्र शिंदे यांनी दिलेले सहकार्य आम्ही विसरू शकत नाही. तसेच त्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड सुध्दा आम्ही कदापिही करू शकणार नाही.

 

आम्ही त्यांचे खुप खुप आभारी आहोत. अशी कृतज्ञता वैष्णवीची आई भारती आणि वडील सुनिल पाचभाई यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
खापरी येथील सुनिल पाचभाई हे हात ठेल्यावरुन भाजीपाला विकतात. त्यांच्या कुटुंबात स्वतः कुटुंब प्रमुख सुनिल पाचभाई , पत्नी भारती , मुलगी वैष्णवी आणि मुलगा वैभव असे एकूण चार सदस्य आहे. सुनिल यांच्या डाव्या हाताला यापूर्वी इजा पोहचली आहे. तरी सुध्दा आपली मुलगी व मुलगा शिकला पाहीजे. त्यांचे जिवन घडविण्यासाठी पाचभाई दाम्पत्य अहोरात्र कष्ट करीत आहे. परंतु वाढत्या महांगाईच्या काळात मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणे त्यांना अत्यंत अवघड जात आहे.
मुलगी वैष्णवी हिला बी.एस्सी. प्रथम वर्ष नर्सिंग अभ्यासक्रमासाठी नागपूर हिंगणा येथील आकार बहुउद्देशीय संस्थेत प्रवेश मिळाला.

 

प्रवेश मिळाल्याने पाचभाई कुटूंबात आनंदी लहरी बहरू लागल्या. परंतु प्रवेश घेण्यासाठी लागणारे प्रवेश शुल्क भरण्यासाठीची रक्कम कशी जमवायची ? या काळजीने पाचभाई कुटूंबाचा आनंद मावळण्यास सुरुवात झाली. शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या सामाजिक कार्याची माहिती कुणीतरी सुनिल पाचभाई यांच्या कानावर टाकली. आणि… अखेर आशेचा किरण पाचभाई कुटुंबाला गवसला.

 

लेकीच्या शैक्षणिक प्रवेशाची चिंता वाढल्याने, सुनिल पाचभाई आणि त्यांच्या पत्नी भारती यांनी मुलगी वैष्णवीसह भल्या सकाळीच रविंद्र शिंदे यांचे निवासस्थान गाठले. रविंद्र शिंदे यांना पाचभाई दाम्पत्यांनी आपली आपबीती कथन केली. लेकीचे प्रवेश शुल्क भरण्यासाठी कृपया काहीतरी व्यवस्था करा, अन्यथा वैष्णवीचा प्रवेश होणार नाही, तिचे एक वर्ष वाया जाईल अशी विनंती पाचभाई दाम्पत्यांनी या प्रसंगी केली.

 

रविंद्र शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावला. पाचभाई कुटुंबाला धिर दिला. तसेच वैष्णवीच्या प्रथम वर्षाचे प्रवेश शुल्क भरण्याची व्यवस्था करण्याची तयारी दर्शविली. तसेच यापुढे सुध्दा सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी पाचभाई दाम्पत्यांसह वैष्णवीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी वैष्णवीचे बी.एस्सी. प्रथम वर्ष नर्सिंग अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश शुल्क भरण्याची व्यवस्था केली. आता वैष्णवीचा प्रवेश सुध्दा निश्चित झाला. वैष्णवीचे वर्ग सुध्दा सुरू झाले. वैष्णवीचा मोठा भाऊ वैभव हा चंद्रपूरच्या शासकीय इंजीनीअरींग कॉलेजचा संगणक शाखेतील तीसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे.

 

यापूढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या लेकींना विकासाची संधी मिळालीच पाहीजे : रविंद्र शिंदे

 

कुठल्याही कुटूंबातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या लेकी विकासापासून दूर राहता कामा नये. त्यांचा सर्वंकष विकास झालाच पाहीजे.त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा तसेच त्यांच्या कर्तृत्वाचा लाभ समाजाला निश्चितच होईल. वैष्णवी सारख्या असंख्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या लेकींना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे त्यांना विकासाची संधी मिळत नाही. काही समस्या व अडचणी असल्यास नि : संकोचपणे संपर्क साधावा. यापुढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांच्या लेकींना विकासाची संधी मिळालीच पाहीजे . असे प्रतिपादन शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!