News34 chandrapur
चंद्रपूर – सत्ता प्राप्तीसाठी माणूस कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्हात आला आहे.जिल्हातील राजुरा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठानच्या निवडणूकीपुर्वी अघोरी प्रकार पुढे आला.
आपल्यालाच सत्ता मिळावी,यासाठी संस्थेतील एका संचालकाने इत्तर संचालकांच्या घरी काळा धागा बांधला, हळद, कुंकू लावले.संशयास्पद वस्तू ठेवल्या.या वस्तू निदर्शनास येताच संचालक हादरले. सीसीटीव्हीमूळे हा प्रकार उघडकिस आला.या अघोरी प्रकाराची तक्रार राजुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.संचालक मेघा नलगे आणि त्यांचे तीन नातेवाईक यांच्या विरोधात ही तक्रार आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार,जिल्हातील राजुरा शहरातील बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठान या संस्थेतर्फे काही शाळा संचालित आहेत.या संस्थेमध्ये संचालक म्हणून अविनाश जाधव, एडवोकेट अरुण धोटे, सुमनताई मामुलकर, अरुण धोटे,डॉक्टर एस. एम. वारकड, बी. यु. बोर्डेवार ,सुदर्शन निमकर, मेघा नलगे, दत्तात्रय येगीनवार ,राजेंद्र जाधव हे सदस्य आहेत.संस्थेचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने सहाय्यक धर्मदाय आयुक्त चंद्रपूर यांच्या आदेशाने निवडणूक घेण्यात आली.
सत्ता आपल्याकडे असावी यासाठी विरोधातील सहा संचालकांच्या घरात काळा धागा, हळद, कुंकू लावले काही संशयास्पद वस्तू ठेवल्यात. अविनाश जाधव, एडवोकेट अरुण धोटे ,डॉक्टर एस. एम. वारकड, बी. यु. बोर्डेवार ,दत्तात्रय येगिनवार यांच्या घरी या वस्तू आढळून आल्यात.हा प्रकार सीसीटीव्ही कैद झाला.हा प्रकार उघळकीस येताच एकच खळबळ उडाली.
सत्ता प्राप्तीसाठी थेट जादुटोण्याचा आधार घेतल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.या प्रकाराणे संचालकांचे कुटुंबिय भयभीत झाले आहेत.हा प्रकार उघडकीस येताच घरी व शेजारच्या सीसीटीव्ही फुटेज बघितल्या गेले.त्यात तिन महिला व एक पुरूष दिसून आला.
असा घडला प्रकार…
संचालक घरी नसतांना त्यांचा घरी तीन महिला, एक पुरुष गेलेत. कुटुंबियांना त्यांनी पाणी मागलेत.पाणी आणण्यासाठी ते गेले असता नेमके त्याच वेळी सोफ्याच्या आत काही वस्तू त्यांनी ठेवल्यात.दरम्यान या प्रकाराची तक्रार राजुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही फुटेज, ऑडीओ रेकाॅर्डींग व सापडलेल्या वस्तू राजुरा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत.या प्रकाराची तक्रार प्राप्त झालेली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी दिली. सध्या या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नाही.