चंद्रपूर चाईल्ड लाईनचे कौतुकास्पद कार्य

News34 chandrapur

चंद्रपूर : बल्लारपूर,रेल्वे पोलीस दलास बल्लारपूर येथे दि. 8 ऑक्टोबर रोजी केरळमधील हरविलेला बालक मिळाला. रेल्वे पोलीस दलाने चाईल्ड हेल्पलाईनला सदर बालकाची माहिती दिली. चाईल्ड हेल्पलाईन टिमने रेल्वे स्टेशन स्टेशन, बल्लारपूर येथे भेट देत बालकांची संपूर्ण माहिती जाणून घेतली. व बालकाची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व बालकल्याण समितीला दिली. तसेच समितीच्या आदेशान्वये, सदर बालकास शासकीय बालगृह येथे ठेवण्यात आले.

 

बालकल्याण समितीने बालकाच्या पालकांशी संपर्क साधला. चंद्रपूर येथे बालक असल्याचे सांगून पालकांना बोलावून घेतले व या केसबाबत बालकल्याण समितीशी चर्चा केली. दि. 10 ऑक्टोबर रोजी बालकाच्या पालकांना बालकल्याण समितीसमोर उपस्थित करण्यात आले. समितीने सर्व कागदपत्रांची तपासणी करुन सदर बालकाला पालकांच्या ताब्यात दिले.

 

सदर प्रकरणात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, सदस्या ज्योत्स्ना मोहितकर, अमृता वाघ, वनिता घुमे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर त्यासोबतच, चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक अभिषेक मोहुर्ले, प्रदीप वैरागडे यांच्यासह चाईल्ड हेल्पलाईन टिमने बालकाला त्याच्या पालकास मिळवून देण्यासाठी महत्वाची भुमिका पार पाडली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!