News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हात नव्याने एन्ट्री मारलेल्या भारत राष्ट्र समितीचा आंदोलनाने प्रस्थापित पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. सामान्य जनतेचा ओढा भारत राष्ट्र समितीकडे वडल्याचे चित्र जीवती मध्ये दिसून आलं.जीवती तालुक्यातील प्रश्नांना घेऊन बीआरएसने जनआक्रोश मोर्चा काढला. भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. अब की बार, किसान सरकार या घोषणानी जिवती शहर दुमदुमल होत.
तेलंगणा राज्याला विकासाच्या उंच शिखरावर घेऊन गेलेल्या के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील राजकारणात पाय पसरवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात झालेल्या त्यांच्या सभेला तुफान गर्दी एकवटली होती. राज्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या जिल्ह्यात त्यांच्या सभा पार पडल्या होत्या.मोठ्या संख्येने बीआरएस कडे जनता वढली असल्याचे चित्र राज्यात दिसून येत आहे.दुसरीकडे राज्याचा शेवटचा टोकावर असलेल्या जीवती शहरात ” अब की बार, किसान सरकार ” हा नारा गुंजला.
महाराष्ट्राचा शेवटचा टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्हातील जिवती तालुक्याची निर्मिती 21 वर्षांपूर्वी झाली खरी मात्र अद्यापही विकासाचा मुख्य प्रवाहात तालुका आलेला नाही. मागासलेपणाची चादर ओढून हा तालुका उभा आहे. अनेक गावात मूलभूत सुविधांच्याही अभाव आहे. तालुक्यात धड रस्ते नाहीत, आरोग्य सुविधा नाहीत.पिण्याचा पाण्यासाठी येथे सारखी वनवन करावी लागते.इथली शिक्षण व्यवस्था पार कोडमलेली आहे. शेत जमिनीचे पट्टे द्या, ही येथील जनतेची मुख्य मागणी आहे. तालुक्यातील जमिनीचे अद्याप फेरफार झालेले नाही.
अश्या विविध प्रश्नांना घेऊन भारत राष्ट्र समितीने जनआक्रोश मोर्चा काढला.भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला.मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट शेत जमिनीचे पट्टे देण्यात यावे,शेत जमीनीचे फेरफार त्वरीत सुरू करावे, सिंचनाचे प्रकल्प,युवकांना रोजगार उपलब्ध करूण देण्यात यावा, अश्या मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या होत्या.
या मोर्च्यात सविता वझे, ज्योती नळे, अनुसूर्या नूती, राकेश चीलकुलवार, बालाजी कारले, अजय साकीनाला, आशिष नामवाड, लखन अडबाले, महेंद्र ठाकूर, सनी रेड्डी, सुभाष हजारे, सुभाष राठोड, सुबोध चिकटे, इस्लाम शेख, विजय राठोड, बालाजी आत्राम, गणेश शेंबडे, संघर्ष पडवेकर, नामदेव कोडापे यांनी सहभाग घेतला. तालुक्यातील खडकी रायपूर, लांबोरी ,महाराज गुडा ,पाटण, शेणगाव ,आंबेजरी, कुंबेजरी ,लेंडीगुडा, भारी ,धाबा, भूरीरऐसपूर, पल्लेजरी, टेकामांडवा, अर्जुना धोंडी सह अनेक गावातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.