Wednesday, November 29, 2023
Homeचंद्रपूर ग्रामीण15 वर्षीय मुलाने उचलले धक्कादायक पाऊल

15 वर्षीय मुलाने उचलले धक्कादायक पाऊल

9व्या वर्गात शिकणाऱ्या करन ने घेतला गळफास

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चिमूर – 17 ऑक्टोबर ला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण गाव हादरुन गेला, तालुक्यातील बेलारा येथील 9 व्या वर्गात शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

बेलारा येथील करण मारोती गुरणुले वय १५ वर्ष असे मृतक मुलाचे नाव आहे तो मदनापूर येथील जय लहरी जय मानव विद्यालय येथे ९व्या वर्गात शिकत होता, आज १७ ऑक्टोबर ला दूपारी ३.३० वाजताच्या दरम्यान सदर घटना उघडकीस आली.

तब्बेत बरी नसल्याने काही दिवस करन शाळेत गेला नव्हता. आज शाळेत जातो म्हणुन गणवेश व बॅग घेऊन तयारी केली. मात्र घरी कुणीही नसल्याचे पाहुन त्याने दोराने गळफास लावुन आत्महत्या केली. दुपारी मोठा भाऊ घरी आल्या नंतर हि घटना उघडकीस आली. घटनेची माहीती चिमूर पोलिसांना देण्यात आली.

 

पोलिस निरीक्षक मनोज गभने,पोलिस उप निरीक्षक भिष्मराज सोरते,पोलिस कर्मचारी भारत घोळवे, राहुल चांदेकर यांचेसह घटनास्थळावर पोहचुन घटनेचा पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उप जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.आत्महत्येचे कारण अजुन स्पष्ट झाले नसुन पुढील तपास सुरु आहे .

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular