News34 chandrapur
चंद्रपूर – शहरातील बाबा नगर बाबूपेठ भागात राहणाऱ्या 25 वर्षीय प्रजेश खंडाळे हा मुलगा 22 सप्टेंबरपासून घरी आला नाही, याबाबत आई भाविका यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदविली, मात्र 8 दिवस उलटल्यावर सुद्धा प्रजेश चा पत्ता लागला नाही, प्रजेश च्या आईने मुलाचा घातपात झाला असल्याची शंका व्यक्त केली आहे.
प्रकरण काय?
भाविका खंडाळे या 22 सप्टेंबरला सकाळच्या सुमारास कामावर निघून गेल्या होत्या, रात्री घरी परतल्यावर त्यांचा मोठा मुलगा प्रजेश त्यांना दिसला नाही, भाविका यांनी 23 वर्षीय लहान मुलगा राजदीप याला विचारले असता दादा घरी आला नाही असे त्याने सांगितले.
आईने शेजारी व आजूबाजूला प्रजेश चा शोध घेतला मात्र तो कुठेही आढळून आला नाही, आई ती आईचं मुलगा येण्याची ती वाट बघू लागली.
24 सप्टेंबरला प्रजेश ने आईच्या मोबाईल वर कॉल केला आई मी मुंबई ला आलो आहे, माझ्यासोबत घराजवळील योगेश व इतर 6 मुले आहे, यावर आईने म्हटले की बाळा काळजी घे? तू कशाला तिथे गेला कसलं काम आहे? यावर तो काही बोलला नाही, मला रोज फोन कर असे म्हटल्यावर प्रजेश ने हो म्हणत कॉल कट केला, मात्र त्या दिवसानंतर प्रजेश ने आई सोबत सम्पर्क साधला नाही, विशेष म्हणजे प्रजेश कडे मोबाईल नसल्याने त्याने दुसऱ्या कुणाच्या मोबाईल वरून आईला सम्पर्क केला होता.
आई भाविका यांना मुलाची काळजी वाटू लागली, प्रजेश ने मी योगेश गेडाम सोबत बाहेरगावी असल्याची बाब आईला सांगितली असल्याने ती 27 सप्टेंबरला शेजारी असलेल्या योगेश गेडाम यांच्या घरी गेली, योगेश हा चंद्रपुरात आला होता, मात्र त्याने याबाबत प्रजेश च्या कुटुंबियांना माहिती दिली नाही.
भाविका यांनी योगेश ला विचारणा केली की प्रजेश आला नाही काय? प्रजेश तर 25 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर उतरला तो आपल्या नातेवाईकांकडे जातो असे म्हणाला.
त्यानंतर भाविका यांनी नागपुरातील नातेवाईकांना सम्पर्क केला असता प्रजेश कुणाकडेच गेला नसल्याची माहिती मिळाली.
तपासात काय निष्पन्न?
भाविका खंडाळे यांनी मुलगा घरी आला नाही म्हणून शहर पोलिसात तक्रार देत 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान काय घडलं, याबाबत सविस्तर माहिती पोलिसांना दिली.
चंद्रपूर शहर पोलिसांनी योगेश गेडाम यांना चौकशीसाठी बोलाविले, त्याने प्रजेश हा नागपूरला उतरला असल्याची माहिती पोलिसांना दिली. ज्या मोबाईल वरून प्रजेश ने आईला सम्पर्क केला त्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन मुंबई होते, 25 सप्टेंबरला प्रजेश नागपूर रेल्वे स्थानकावर उतरला काय? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
योगेश ने प्रजेश च्या घरी न सांगता त्याला बाहेरगावी कशासाठी नेले होते? योगेश घरी परतला तेव्हा त्याने प्रजेश च्या आईला याबाबत माहिती का दिली नाही? योगेश ने जे बयान पोलिसांना दिले तीच खरी माहिती आहे काय? त्याच्या माहितीवर पोलिसांनी क्रॉसचेक केलंय का? प्रजेश सोबत गेलेले इतर मूल कोण? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे, याबाबत पोलिसांशी सम्पर्क केला असता ते म्हणतात तपास सुरुच आहे.
मागील आठवडाभरापासून प्रजेश ची आई योगेश ला मुलांबाबत विचारत आहे, मात्र तिला समाधानकारक उत्तर योगेश कडून मिळत नसल्याने ती न्यायासाठी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढत आहे, भाविका खंडाळे यांना पोलिसांकडून न्याय हवा? पोलीस न्याय देतील काय? प्रजेश चे काही बरे वाईट तर झाले नाही? अशी शंका आई भाविका यांच्या मनात निर्माण होत आहे.
प्रजेश जवळ खर्च करायला पैसे नाही, त्याच्या अंगावर जे कपडे आहे तेच त्याच्याजवळ आहे, तो काय करीत असेल? काय जेवण करीत असेल असे शब्द प्रजेश ची आई पुटपुटत असते.
वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलांना मोठं केलं व आज अशी परिस्थिती भाविका खंडाळे यांच्यापुढे उभी झाली, मुलगा आज येणार उद्या येणार अशी आस आईच्या नजरेसमोर आहे.
दरवर्षी हजारो लाखो महिला व पुरुष बेपत्ता होतात मात्र काही जणांचा शोध लागतो, आजही लाखो नागरिक पोलिसांच्या रेकॉर्डवर हरविल्याची नोंद आहे, मात्र त्यांना कुणी शोधणारा नाही, माझ्या मुलाला शोधून द्या अशी आर्त हाक एक आई पोलिसांना करीत आहे.