News34 chandrapur
भद्रावती : तालुक्यात शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे उपनेते तथा मुंबईचे माजी नगरसेवक चंद्रपुर लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक मनोज जामसुतकर आणि मुंबईचे माजी नगरसेवक सुर्यकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात ७५-वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात ‘ होवू द्या चर्चा ! ’ उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाला जनतेचा ठिकठिकाणी जोरदार प्रतिसाद मिळत आहे. काल दि. १ ऑक्टोंबर रोजी कोंढा -घोडपेठ जि.प . क्षेत्रात घोडपेठ व मोहबाळा येथे तसेच नंदोरी -कोकेवाडा जि.प. क्षेत्रात नंदोरी ( बु. ) व सागरा येथे सदर उपक्रम आयोजित करण्यात आला. सदर उपक्रम वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये 1 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे.
७५-वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या “होवू द्या चर्चा !” उपक्रमात जिल्हा महीला आघाडी प्रमुख नर्मदा दत्ता बोरेकर, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने, वरोरा-भद्रावती विधानसभा समन्वयक वैभव डाहाने, विधानसभा सघंटक मगेश भोयर, तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल , उपजिल्हा सघंटीका माया नारळे ,तालुका महीला सघंटीका अश्लेषा जिवतोडे-भोयर , युवासेना तालुका अधिकारी राहुल मालेकर आणि विभाग प्रमुख सिध्दू पेटकर यांच्यासह फार मोठया संख्येत शिवसैनिक भद्रावती तालुक्यात ‘ होऊ द्या चर्चा !’ उपक्रमाची जनेतला माहीती देत जनसंवाद साधत आहे.