News34 chandrapur
चंद्रपूर – शिक्षण व नोकरी बचाव समिती तर्फे 20 ऑक्टोबर ला शहरात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, मात्र हा मोर्चा कांग्रेसतर्फे हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला असून शिक्षण व नोकरी बचाव समिती तर्फे शिवानी वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमांवर टाकलेले व्हिडीओ डिलीट करावे अशी विनंती करण्यात आली आहे.
युवा कांग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी शिवानी वडेट्टीवार यांनी समाज माध्यमांवर 20 ऑक्टोबर च्या मोर्च्याबाबत व्हिडीओ प्रसारित केले आहे, सोबतच वृत्तपत्रांचे कात्रण टाकत जन आक्रोश मोर्चा हा कांग्रेसचा आहे असे दर्शविण्यात आले आहे.
ही बाब शिक्षण व नोकरी बचाव समिती सदस्यांना कळताच त्यांनी यावर आक्षेप घेत सदर व्हिडीओ समाज माध्यमातून डिलीट करावा अशी मागणी करण्यात आली आहे, समनव्य समितीचे सदस्य विजय मुसळे यांनी वडेट्टीवार यांच्या या कृत्याबाबत आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे, सदर मोर्चा हा युवक व विद्यार्थी वर्गाचा सरकारवर असलेला रोष आहे, सरकारने शासकीय नोकरी चे खासगीकरण व शिक्षणाचे कंत्राटीकरण करण्याच्या शासन निर्णय काढला आहे, त्यावर राज्यातील विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बेरोजगारांचा तीव्र निषेध असून त्याचा विरोध करण्यासाठी 20 ऑक्टोबर ला चंद्रपुरात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुख्य मागणी
सर्व विभागातील रिक्त जागेवर कायमस्वरूपी पदभरती करावी, ‘दत्तक शाळा योजना’ राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, NPS रद्द करून शिक्षक-राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, MPSC व इतर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षेचे शुल्क कमी करून १०० रुपये ठेवावे, IBPS/ TCS किंवा इतर खासगी संस्थामार्फत विविध पदाच्या स्पर्धा परिक्षा न घेता सर्व परिक्षा MPSC आयाेगाद्वारे घेण्यात याव्या, विविध शासकीय पदभरतीसाठी होणाऱ्या स्पर्धा परिक्षेतील पेपर फुटीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा, विद्यार्थी हितासाठी २० पटाखालील शाळा बंद होऊ नयेत, यासाठी समूह शाळा संकल्पना रद्द करणे, राज्य शासनातील शासकीय कार्यालयातील रिक्त पदे व अनुदानित संस्थेमधील शिक्षक – प्राध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरावी आदी मागण्यांचा जनआक्रोश मोर्चात समावेश आहे.