समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू

News34 chandrapur

बुलढाणा – सैलानी बाबा यांचे दर्शन घेऊन परत निघालेल्या भाविकांचा शनिवारी मध्यरात्री समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला या अपघातात तब्बल 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावरील वर्ष 2023 मधील दुसरा भीषण अपघात आहे.

कशी घडली घटना?

नाशिक जिल्ह्यातील काही भाविक बुलढाणा येथे सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेले होते, दर्शन झाल्यावर नाशिक कडे परत जात असताना वैजापूर जांबरगाव शिवारातील टोल नाक्याजवळ उभ्या ट्रक ला भाविकांच्या गाडीने धडक दिली, धडक इतकी जोरदार होती की 12 भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

 

स्थानिक नागरिक धावले मदतीला

 

अपघाताची माहिती मिळाल्यावर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य चालविले, अपघातात भाविकांचे टेम्पो ट्रॅव्हलर वाहन हे पूर्णतः चक्काचूर झाले, वैजापूर पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली असता तात्काळ घटनास्थळी 5 ते 6 अंबुलन्स दाखल झाले, 20 प्रवासी जखमी झाले असून काहींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातात जखमी व मृत प्रवासी हे नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी गावातील निवासी आहे.

वैजापूर जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावरील जांबर गाव टोलनाक्यावर उभ्या ट्रक ला भाविकांच्या गाडीने धडक दिली, मृतांमध्ये 4 महिन्याचा बालकाचा सुद्धा समावेश आहे.

 

अपघातांचे कारण समोर

स्थानिक नागरिकांनी सांगितले की शनिवारी रात्री RTO ने समृद्धी महामार्गावर ट्रक अडविला, ट्रक बाजूला घेत असताना हा अपघात झाला, धडक इतकी भीषण होती की अपघाताचा आवाज परिसरातील गावात दणाणला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!