Thursday, April 25, 2024
Homeग्रामीण वार्तामूल येथे सत्यशोधक परिषद संपन्न

मूल येथे सत्यशोधक परिषद संपन्न

भांडवलशाही विरोधात संघर्ष उभा करण्याची वेळ - डॉ. अभिलाषा गावतुरे

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर/मूल – मुल येथे सत्यशोधक समाजाच्या दीडशे व्या स्थापना दिवसानिमित्त भूमिपुत्र ब्रिगेडतर्फे सत्यशोधक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अभिलाषा गावतुरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नंदुरबार इथून आलेले सुप्रसिद्ध व्याख्याते सुरेश झाल्टे हे होते.

 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गनांमध्ये सत्यशोधक समाज जिल्हा चंद्रपूर चे अध्यक्ष हिराचंद बोरकुटे, माळी मिशन राजकीय समिती प्रमुख महाराष्ट्र राज्य इंजिनिअर वासुदेवराव चौधरी अमरावती, अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सचिन भेदे, प्रसिद्ध साहित्यिक आणि लेखक प्रबर्मानंद मडावी, अखिल भारतीय महिला माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष छायाताई सोनुले, ज्ञानज्योती फाउंडेशन सावलीचे अध्यक्ष दिनकर मोहूर्ले, सद्गुरु डोले, दीपक वाडी, बेंबळ डॉक्टर पद्माकर लेनगुरे, विदर्भ तेली महासंघाचे महासचिव गंगाधर कुंनघाडकर, ओबीसी विचार मंच कैलास चालक इत्यादी मानव मंचावर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे संचालन एडवोकेट प्रशांत सोनुले प्रस्तावना समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विजय लोणबुले यांनी केली, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश मोहरले मनीष मोहूरले पाटील वाळके रामदास सोनुले रोहित निकुरे श्रीकांत शेंडे आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

 

याप्रसंगी बोलताना व्याख्याते सुरेश झाल्टे यांनी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या उगमापासून त्या शतक चळवळीचा संपूर्ण इतिहास काळाच्या पडद्याआड आणि इतिहासात उल्लेख न केलेल्या सर्वशोधकांचे या चळवळीला योगदान आणि एकूणच फुले शाहूं आंबेडकरी चळवळीचे या देशाच्या आणि समाजाच्या जडणघडणीमध्ये योगदान विशद केले.

 

हिराचंद बोरकुटे यांनी सांगितले की आजचा ओबीसी समाज जर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांनी चालला तर त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक समस्या सहज सुटू शकतात.

 

डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी या कारणासाठी आणि ज्या उद्देशासाठी सत्यशोधक चळवळ उभी केली आणि शूद्र अतिसूद्रांना मनुवादी गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जो संघर्ष उभा केला तो संघर्ष आजच्या बहुजन समाजाला इथल्या आजच्या भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध आणि शासन प्रशासन व्यवस्थेविरुद्ध उभा करण्याची गरज प्रतिपादित केली.

 

खासकरून शिक्षण क्षेत्राचे झालेले होत असलेले कंत्राटीकरण आणि सरकारी शाळा आणि सरकारी शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आपण उधळून लावला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!