News34 chandrapur
चंद्रपूर – छोटा नागपूर येथील विचोडा समोर 3 ऑक्टोबर ला अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहनाने चौघांना उडविले, 4 जणांची प्रकृती सध्या नाजूक आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात खनिज संपत्तीला लुटणाऱ्यांची संख्या आज मोठ्या प्रमाणात वाढली आहे, छोटा नागपूर परिसरातून अवैध रित्या मुरुमाची तस्करी सुरू आहे, आज या मुरुम तस्करी करणाऱ्या वाहन क्रमांक MH34 AB2444 या वाहनाने चार नागरिकांना उडविले, या अपघातात दोघांचे पाय निकामी झाले तर एकाचे हात व एक गंभीररीत्या जखमी झाले. गंभीर जखमीमध्ये मुलीचा समावेश आहे. अपघात करणारे वाहन हे नितीन नगराळे यांच्या नावावर आहे.
छोटा नागपूर ते विचोडा मार्ग हा पूर्णतः खड्ड्यात गेला आहे, विशेष म्हणजे चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट अभियंता म्हणून पुरस्कार भेटला आहे.
सदर रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे कंत्राट डोंगरे यांना मिळाले आहे पण अजूनही हा मार्ग खड्ड्यात आहे, आज अवैध मुरूम वाहतुकीमुळे हा प्रकार घडला मात्र प्रशासन या तस्करी वर गप्प आहे.