Sunday, April 21, 2024
Homeगुन्हेगारीचंद्रपुरात मिटकरीला अटक

चंद्रपुरात मिटकरीला अटक

10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर/मूल – शेत जमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करण्यासाठी दुय्यम निबंधकाने अर्जदाराला 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, 12 ऑक्टोबर ला तडजोडीअंती 10 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने दुय्यम निबंधकाला रंगेहात अटक केली. Bribe

 

मूल तालुक्यातील मौजा मारोडा येथे राहणारे तक्रारदार हे स्वतः दस्तलेखनाचे काम करतात, तक्रारदार यांच्याकडे त्यांचे पक्षकार यांची शेती दुसऱ्याच्या नावावर करायची होती त्या संबंधीचे दस्त नोंदणीचे काम करीत पुढील कामाकरिता सदर कागदपत्रे दुय्यम निबंधक कार्यालय मूल येथील दुय्यम निबंधक श्रेणी 1 अधिकारी 44 वर्षीय श्रीमती वैशाली मिटकरी यांच्याकडे जाऊन दस्त तपासणी व शेत जमिनीचे मूल्यांकन काढत दस्तांची मुद्रांक व नोंदणी फी बाबत विचारणा केली असता सदर कामासाठी फी व्यतिरिक्त 15 हजार रुपयांची मागणी मिटकरी यांनी केली. Acb trap

 

तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत विभागात तक्रार दिली, तक्रारीची पडताळणी केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 12 ऑक्टोबर ला सापळा रचला.

 

तडजोडीअंती 10 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी वैशाली मिटकरी यांनी दर्शविली, दुय्यम निबंधक कार्यालय मूल येथे 10 हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारताना वैशाली मिटकरी यांना रंगेहात अटक करण्यात आली.

 

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, पोलीस कर्मचारी हिवराज नेवारे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, पुष्पा काचोळे यांनी केली.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!