चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर पोलिसांवर गंभीर आरोप

News34 chandrapur

चंद्रपूर : पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यात साक्षीदार असलेल्या आणि पोलिसांना वेळोवळी मदत करणाऱ्या साक्षीदाराला गावातील काही गुंडाकडून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने तसेच पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्यात येत असल्याने गाव सोडण्याची वेळ आली आहे. अरुण झाडे विरूर स्टे. असे या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, पोलीसही गुंडाच्या सांगण्यावरून खोटे गुन्ह दाखल करीत असल्याचा आरोप अरुण झाडे यांनी चंद्रपूर येथे श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

 

श्रावणकुमार ओरगंटी, राजरेड्डी गोगुलवार, राधा सतीश ओरगंटी यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्याविरोधात दारूविक्रीची पोलिसात तक्रार केल्याचा संशय घेऊन वाद घालत मारहाण केल्याची तक्रार झाडे यांनी पोलिसांनी केली होती. या तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

यानंतर वारंवार मला दमदाटी आणि धमक्या दिल्या जात आहे. याबाबत आपण विरूर पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रारी केल्या आहेत. परंतु, पोलीस मलाच दमदाटी करून तक्रार घेत नाही. त्यामुळे गुंडांची हिमत वाढत आहे. यानंतर गुड्डू शेख यांनी रेती तस्करीची तक्रार केली म्हणून जिवे मारण्याची धमकी देत आहे. याबाबतची तक्रारही पोलीस ठाण्यात करण्यात आली. पंरतु, पोलिसांनी तक्रार घेतली नाही. गावातील दारूतस्कर, रेतीतस्करांना बळ देण्याचे काम स्थानिक ठाणेदार करीत असून गुंडांमुळे गाव सोडावे लागल्याने जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप झाडे यांनी केला आहे.

 

४ जुलै २०२३ रोजी काही दारूविक्रेत्यांनी चिरंजिव चिलका याला दारू पाजून मला मारण्यासाठी पाठविले. जगतसिंग यांच्या हॉटेलात बसून असताना चिलका यांने शिवीगाळ केली. पंरतु, मी पोलिसांना फोनवर माहिती दिल्यानंतर पोलीस आले. यांनतर पोलीस ठाण्यात गेलो. यावेळी पोलीस ठाण्यात गुड्डू शेख, राजरेड्डी गोगुलवार यांनी पोलिसांसमोर झाडाला बांधून मारण्याची धमकी देत होते. पंरतु, ठाणेदारांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप अरुण आबाजी झाडे यांनी केला आहे.

 

मला वारंवार धमकी देणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी अरुण झाडे यांनी केली आहे

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!