तहानलेल्या गावांना मिळणार पाणी..! सरपंच संघटनेच्या मागणीला यश

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल – मागील काही दिवसापासून बेंबाळ, गोवर्धन, नांदगाव, घोसरी, बाबराळा, नवेगाव भुजला, चकदुगाळा या गावातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पाणीपुरवठा बंद असल्याने या गावातील नागरिकांना पाण्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.

 

परिसरातील नागरिक दूषित पाणी पिल्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला होता. याबाबत सरपंच संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरू करण्यासंदर्भात सतत पाठपुरावा केला होता. याबाबत शासनाच्या बैठकीमध्येही सरपंच संघटनेच्या वतीने सहभागी होऊन चर्चा करण्यात आली होती.

 

पाण्यासाठी गावातील जनतेचे हाल होत असल्याने प्रशासनानेही याची गंभीर दखल घेऊन पाणीपुरवठा बाबतचा निधी प्रशासकीय स्तरावरून उपलब्ध करून देऊन पाणी पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सततच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे व प्रशासनाच्या सहकार्यामुळे ही योजना पुन्हा सुरू झाली त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार होऊन नागरिकांनी सरपंच संघटनेचे व प्रशासनाचे आभार मानले.

 

या यशाबद्दल बेंबाळचे सरपंच चांगदेव केमेकार, नांदगावच्या सरपंच हिमानीताई वाकुडकर, बाबराळाचे सरपंच धिरज गोहणे, नवेगाव भुजला सरपंच यशवंत खोब्रागडे, गोवर्धनचे सरपंच गोपिकाताई जाधव, चकदूगाळा सरपंच प्रीती ताई भांडेकर, घोसरीच्या सरपंच रोशनी लोढे यांचेही नागरिकांनी आभार मानले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!