Thursday, May 23, 2024
Homeक्रीडाचंद्रपुरात वेकोलीच्या चुकीमुळे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

चंद्रपुरात वेकोलीच्या चुकीमुळे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

त्या सिव्हरेज प्लांट ने घेतला 12 वर्षीय मुलाचा बळी

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – वेकोली दुर्गापूर क्षेत्रात असलेल्या सिव्हरेज प्लांट मध्ये 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेत दुर्गापुरात राहणाऱ्या 12 वर्षीय प्रेम बाळू वाघमारे चा मृत्यू झाला.

दुर्गापूर वेकोली क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सिव्हरेज प्लांट जवळ 3 मुले खेळायला गेली होती, 2 मुले घरी परतली मात्र प्रेम घरी न आल्याने कुटुंब व मित्रांनी त्याची शोधाशोध सुरू केली.

 

सिव्हरेज प्लांट जवळ मित्र व कुटुंब पोहचले असता त्याठिकाणी प्रेम चा मृतदेह आढळला, सिव्हरेज प्लांट मध्ये असलेल्या पाण्यात बुडून प्रेम चा मृत्यू झाला.

 

या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रेम चा मृतदेह वेकोली उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणत ठिय्या आंदोलन सुरू केले.

 

तणावाची परिस्थिती निर्माण होताचं वेकोलीचे अधिकारी, पोलीस प्रशासन व दंगापथक त्याठिकाणी दाखल झाले.

इंटक चे केके सिंग यांनी त्याठिकाणी पोहचत घटनेची माहिती घेत पीडित कुटुंबाला 25 लाखांची मदत मिळावी अशी मागणी करीत त्याबाबत सूचना केल्या, वेकोली द्वारे तात्काळ त्याबाबत पत्र व्यवहार करण्याचे आश्वासन मिळाले व अंत्यसंस्कार साठी 25 हजारांची मदत वेकोली तर्फे देण्यात आली.

 

विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून तो सिव्हरेज प्लांट बंद अवस्थेत आहे, या प्लान्ट मध्ये आतापर्यंत अश्या 3 घटना घडल्या असून याबाबत वेकोलीने त्या प्लांट ची विल्हेवाट लावली नसल्याने आज 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे दुर्गापूर परिसरात शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!