News34 chandrapur
चंद्रपूर – बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं.या राजाला सरकारने अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे.आत्महत्याग्रस्त कुटुंबाला साधं राशन कार्ड काढण्यासाठी कार्यालयाचा शंभर चकरा माराव्या लागल्यात. हा प्रकार चंद्रपूर जिल्हात घडला. हा प्रकार लक्ष्यात येताच बीआरएसचे नेते भूषण फुसे यांनी कुटुंबाची भेट घेतली. त्यांना राशन कार्ड मिळवून दिले. घरच्या कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंबाची वाताहात होते. ही वाताहत येथील लोकप्रतिनिधीना दिसू नये ही मोठी शोकांतिका आहे.
जिल्ह्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवारास आर्थिक मदत द्यावी, सर्व शासकीय योजना व पीक नुकसानीचे अनुदान देण्याची कारवाई तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी बीआरएसचे नेते भूषण फुसे यांनी केली होती.तसे त्यांनी निवेदन जिल्हाधिकारी दिले आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडे सरकार आणि प्रशासनाचे अक्षरश दुर्लक्ष झाले आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या चिंचोली येथील महादेव लोंढे यांनी कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. या कुटुंबाकडे सादर राशन कार्डही नव्हतं. राशन कार्ड काढण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्राची पूर्तता त्यांच्या कुटुंबांनी केली. मात्र तरीही कार्ड मिळवण्यासाठी त्यांनी मोठी पायापिट केली. तरीही त्यांना कार्ड मिळालं नव्हतं. त्यांनी बीआरएसचे नेते भूषण फुसे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. फुसे यांनी पाठपुरावा करून त्यांना राशन कार्ड मिळवून दिल.
जिल्ह्यात मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे, यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतातील पीक हातात न आल्याने बँकेच्या व इतर सावकारांच्या कर्जाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागत आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे. तालुकास्तरावरून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आवश्यक मदत पुरविण्यात दिरंगाई करण्यात येत आहे. दप्तर दिरंगाईमुळे यांची कागदपत्रे पुढे पाठविली जात नाही. यामुळे त्या परिवाराला असंख्य हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.
दरम्यान शेतकऱ्यानी आत्महत्या केल्यानंतर त्या कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब निराधार होते. त्यामुळे निराधार योजना आणि इतर उपजीविकेच्या व मदतीच्या योजना तत्काळ राबवायला पाहिजे. जिल्ह्यात कुठेही शेतकरी आत्महत्या प्रकरण घडले, त्याची त्वरित चौकशी करून त्या कुटुंबाला तत्काळ शासकीय मदत पुरवावी. त्यावर असलेले कर्ज व त्याची कारवाई करावी आणि त्या कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ त्वरित देण्यात यावा, अशी मागणी फुसे यांनी यावेळी केली.