News34 chandrapur
मुल – मुल तालुक्यात एकमेव धानाचे उत्पन्न शेतकरी घेत असून सिंचन सुविधे अभावी केवळ धान हेच एकमेव उत्पन्न शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे. एका उत्पन्नाच्या भरोशावर मुल सावली तालुक्यातील शेतकरी बांधव विसंबून आहेत असे असताना ऐन धान फसलची कापनी करण्यात आली असून धानाची कापणी झाल्यानंतर धानाचा दाना पूर्ण वाळविण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो परंतु कापणी होऊन चार – पाच दिवस झाले आहेत.
तसेच अनेक शेतकऱ्यांची कापणी अजूनही सुरू आहे. असे असताना आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९-०० वाजता आकस्मिक पाऊस आल्याने मुल चीमढा, बोरचांदली, राजगड, फिस्कुटी, विरई, खेडी, टेकाडी, गडीसुर्ला, जूनासूर्ला, नवेगाव (भू) बेंबाळ, नांदगाव, भेजगावं,हळदी, चीचाला, टाडाळा, जा,चीरोली, कांतापेठ, मारोडा, भादूर्णी, राजोली, चिखली, डोंगरगाव, यांचेसह मुल व सावली तालुक्यातील अनेक गावातील कापलेले धानाच्या सरड्या पूर्ण ओल्या झाल्या असून शेतकऱ्यांच्या हाती आलेले उत्पन्न पाऊसामुळे खराब झाल्याने असंख्य शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
मुल- सावली तालुक्यातील काही शेतकरी मजुरांच्या हाताने धानाची कापणी केली तर काही शेतकऱ्यांनी खर्चाचा बजेट लक्षात घेता हार्वेस्टर मशीन लाऊन धान कापणी व चुरणी एकसाथ केली असून शेकडो क्विनटल धान वाळत ठेवले असून पाण्यात भिजल्याने अतोनात नुकसान झाली आहे. तालुक्यातील शेतकरी बांधव आकस्मिक येत असलेल्या पाऊसामुळे एकही पोता धान घरी आणते की काय ? असा प्रश्न अनेक शेतकरी बांधवांना पडला असून गेल्या दोन वर्षापूरवी अशीच परिस्थिती आली होती. त्यावेळेला महावीकास आघाडीचे शासन असताना कृषी मंत्री श्री. दादा भुसे, आमदार तथा पालक मंत्री श्री. विजय वडेट्टीवार, सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष शिंह रावत, चंद्रपूर जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी प्रत्यक्ष मुल – सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पाहणी केली होती. तेव्हा शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट पसरले होते तशीच परिस्थिती यावषी सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी बांधव हैराण झाले आहेत.
दरवर्षीच काही ना काही संकट शेतकऱ्यांवर येतच असतात. यावर्षी सुरवातीलाच धांनाला २८०० रुपये पर्यंतचा भाव मिळत आहे. परंतु आता आलेल्या पाण्यामुळे धानाची पोत ओली झाली तर मात्र कोणताही व्यापारी ओले झालेले धान घेणार नाही. कारण तांदूळ लाल होतात. म्हणजे आजच्या स्थितीत शेतकऱ्यांची स्थिती हाती उत्पन्न येऊनही कपाळावर हात ठेऊन रडत बसण्याची पाळी शेतकरी बांधवावर येऊन पडली आहे. हीच परिस्थिती कापूस लावलेल्या शेतकऱ्यांची आहे.
कापसाचे बोंड वेचण्यााठी आली असताना अचानक आकस्मिक पाऊसाने कापूस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे. अशा प्रसंगी शासनाने, मा. पालक मंत्र्याने, जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी तात्काळ मुल सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर येऊन पाहणी करावी व शासनाकडे तसा अहवाल त्वरित सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी चालू वर्षाचा खरीप पिकाचे विमा काढला असून शासनानेच विमा कंपनीला तसे आदेश देऊन शेतकऱ्यांची शेतीची पाहणी करायला लावावी आणि शेतकरी बांधवांना त्वरित नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी मुल – सावली तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे.