News34 chandrapur
चंद्रपूर – लहान मुले व नागरिकांच्या मनोरंजनासाठी चंद्रपूर शहरातील चांदा क्लब मैदानावर नुकतंच आनंद मेळा सुरू झाला आहे, मात्र या मेळा धारकाने सार्वजनिक मार्गावर अतिक्रमण केल्याने नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून चंद्रपूर शहरातील चांदा क्लब मैदानावर आनंद मेळा सुरू झाला, मात्र या मेळा धारकांनी आपली मुजोरी सुरू करीत चंद्रपूर-नागपूर मार्गावर अतिक्रमण केले आहे, विशेष बाब म्हणजे वाहतूक व चंद्रपूर पोलिसांचे बॅरिकेट्स चा वापर अतिक्रमणसाठी केला.
चांदा क्लब मैदानाच्या आत सुरू असलेल्या या मेळ्यात येणारे नागरिक आत वाहन पार्क करतात मात्र मैदानाच्या बाहेर नागरिकांनी आपली वाहने पार्क करू नये यासाठी वाहतूक पोलिसांचे बॅरिकेट्स चा वापर करून चंद्रपूर-नागपूर मार्गावरील तब्बल 100 मीटर वर दोरीच्या साहाय्याने मेळा धारकाने अतिक्रमण केले आहे.
वाहन पार्क न करू दिल्याने अनेक नागरिकांसोबत मेळा धारकाचे अनेकदा भांडण सुद्धा झाले आहे, मात्र आमचं कुणी काही बिघडवू शकत नाही अशी मुजोर भूमिका मेळा धारकाने घेतली आहे.
चंद्रपूर-नागपूर मार्गावर आधीच अतिक्रमणामुळे अनेक अपघात घडले असताना वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून मेळा धारक आपली मुजोरी करत असल्याने हा रस्ता माझ्या बापाचा आहे असे दर्शवित आहे.
शहरात पुन्हा अपघाताला आमंत्रण देणाऱ्या मुजोर आनंद मेळा धारकावर पोलीस व वाहतूक पोलीस प्रशासन कारवाई करणार काय? की मेळा धारकाच्या मुजोरीला प्रशासन आशीर्वाद देणार? वाहतूक पोलिसांनी मेळा धारकाला चंद्रपूर-नागपूर मार्गावर अतिक्रमण करण्याची रीतसर परवानगी दिली आहे काय? प्रशासन त्या अतिक्रमण धारकाला पाठीशी घालत आहे काय? असे अनेक प्रहन यावेळी उपस्थित झाले आहे.