चंद्रपुरात कामगार कायद्याची पायमल्ली, शिवसेना करणार आंदोलन

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, जिल्ह्यात विविध उद्योगांचे जाळे पसरले आहे, मात्र अनेक उद्योगात स्थानिक कामगार नसल्याने जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे.

 

वेकोली चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी येथे ओव्हरबर्डन काढण्याच्या कामाचं कंत्राट दक्षिण भारतातील कावेरी कंपनीला मिळाले आहे, मात्र या कंपनीने बाहेरून कामगार आणल्याने स्थानिक कामगारांना काम देण्यास कावेरी प्रबंधन टाळाटाळ करीत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी कंपनी प्रशासनाला स्थानिक कामगारांना कामावर घ्या असे सुचविले मात्र त्यांच्या या मागणीवर कंपनीने दुर्लक्ष केले.

 

कावेरी कंपनीच्या विरोधात 11 डिसेंबर 2023 ला कावेरी कंपनी विरुद्ध शिवसेना आंदोलन करणार आहे.

परप्रांतीय कामगारांना कावेरी कंपनीने कामावर घेतले, मात्र त्यांचं कसल्याही प्रकारचे पोलीस व्हेरिफिकेशन, कामगारांची नोंदणी, उत्खनन साठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नोंदणी करण्यात आली नसून ते बेकायदेशीर पणे वेकोलीच्या क्षेत्रात चालत आहे.

 

या सर्व बेकायदेशीर कृत्याचा विरोध व स्थानिक कामगारांवर अन्याय करणाऱ्या कावेरी कंपनी विरुद्ध शिवसेनेने आंदोलनाचे हत्यार उपसले असून 11 डिसेंबर ला कंपनी प्रबंधन विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, आंदोलनाबाबत संबंधित विभागाला निवेदने देण्यात आली आहे.

 

सदर आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वाखाली होणार असून या आंदोलनात शिवसेना, युवासेना आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!