चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयास औषधांसाठी निधी द्या – ब्रिजभूषण पाझारे

News34 chandrapur

चंद्रपूर : चंद्रपूरातील वैद्यकीय महाविद्यालयात महिनाभरापासून औषधांचा साठा संपला आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. वातावरणामुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढली आहे.

 

ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची उपचार घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी असते. मात्र, औषधांचा तुटवडा असल्यानं बाहेरून औषधांची खरेदी करावी लागत असल्याने आर्थिक झळ बसत आहे.

 

गोरगरिबांचा आधार असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात मागील काही महिन्यापासून औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. येथे अवघड शस्त्रक्रिया, तसेच चांगले उपचार दिले जातात, अशी या वैद्यकीय महाविद्यालयाची ओळख आहे. रुग्णालय अधिक उत्तम बनवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची निधी शासनाने मंजूर केला आहे. परंतु औषधासाठीचा निधी शासनाने वाढवून दिला नसल्याचे चित्र आहे.

 

परिणामी रुग्णासाठी लागणारे औषध बाहेरून खरेदी करावे लागत आहेत. तरी याकडे तत्काळ लक्ष वेधून वैद्यकीय महाविद्यालयास औषधांकरिता निधी उपलब्ध करून देण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा चंद्रपूर महानगरातील शिष्ट मंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी चंद्रपूर जिल्हा महानगराचे महामंत्री श्री ब्रिजभूषण पाझारे, श्री रमेश जी राजुरकर विधानसभा प्रमुख वरोरा भाजयुमो अध्यक्ष श्री. विशाल निंबाळकर, महानगराचे मन की बात प्रमुख श्री. डॉ. दिपक भट्टाचार्य, श्री. पोद्दार, श्री. सतीश तायडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!