News34 chandrapur
चंद्रपूर : चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गोविंदा पोडे, मुलगा चैतन्य व भाचा गणेश उर्फ उज्वल उपरे यांचा दुर्दैवी व अकाली मृत्यू झाला. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी त्यांच्या नांदगाव येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, ओबीसी नेते नरेंद्र बोबडे, चंद्रपूर तालुका काँग्रेस काँग्रेस अध्यक्ष अनिल नरुले, काँग्रेस युवा नेते सचिन कत्याल,अनिता बोबडे यांची उपस्थिती होती.
मोठ्या वडिलांचे अंतिम विधीनंतरचे कार्य पार पडण्यासाठी अख्खे कुटुंब व नातेवाईक वर्धा – इरई नदीच्या संगमावर गेले. तेथे मोठ्या वडिलांच्या अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम घेतला. अखेरच्या टप्प्यात घराकडे परतण्याची तयारी केली जात होती. मात्र नियतीला हे मान्य नव्हते. वर्धा नदीच्या खोल पाण्यात एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला. हि दुर्दैवी घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) गावाजवळ वर्धा – इरई नदीच्या संगमावर रविवारी घडली. हि घटना दुर्दैवी असून यातून पोडे कुटुंबियांना सावरण्याची शक्ती देण्याची प्रार्थना यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली.