News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल – मुलचे प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ नागरिक, कांग्रेस विचारसरणीचे सेवादलाचे मुल तालुका प्रमुख श्री. नामदेवराव बाबाची गावतुरे (डॉक्टर राकेश गावतुरे यांचे वडील आणि डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांचे सासरे) यांचा वां ८५ वाढदिवस अनेक आपतेष्ट, कार्यकर्त्यांच्या आणि समाज बांधवांच्या उपस्थितीत अभिष्ठ चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रिय आमदार माननीय प्रतिभाताई धानोरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना श्री. गावतूरे काकाजिंनी गरिबीतून कुटुंबाची प्रसंगी समाजाची प्रगती साधण्याचा प्रयत्न करून असा मौलिक सल्ला आपल्या कार्यकाळात दिला यात शशिकला काकूंचा मोलाचा वाटा असल्या बद्दल त्यांचे कौतुक केले.
त्याचबरोबर मंचावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार ,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. रामभाऊ महाडोळे, दीपक पाटील वाढई, प्रल्हादजी कावळे सर, उमाजी दादा मंडलवार ,प्रा. गुलाब मोरे, प्रा.कऱ्हाडे, डॉ. सचिन भेदे, जिल्हा रुग्णालयाचे डॉ .बंडू रामटेके समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोणबले, सहितिक प्रब्रह्मानंद मडावी, नीपचंदजी शेरकी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दिनांक 20 नोव्हेंबर 1938 रोजी बाबाजी पाटील गावतुरे व सौ भागाबाई गावतुरे यांच्या पोटी नामदेवरावांचा जन्म झाला त्या काळात शिक्षणाच्या सोयी गावात नसल्यामुळे चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर शिक्षणात खंड पडला पण शिक्षण घेण्याची आवड आणि संघर्ष करण्याचं साहस असल्यामुळे मुल येथील चरखा संघ वस्तीगृहात काम करून स्वतःची उपजीविका कमवून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
गांधीजींच्या महान स्वदेशीच्या विचाराने प्रेरित होऊन दररोज सकाळ – संध्याकाळी सूत कातणे सुताच्या गोंद्या कापड विणण्यासाठी देणे व तेच खादीचे वस्त्र वापरणे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य अंग झाला होता. इसवी सन 1960 मध्ये आपण एका वर्षाचे अखिल भारतीय एखादी ग्रामोदय बोर्डाचे उस्मानाबाद येथे प्रशिक्षण घेतले सिंदेवाही येथे सन 1960 आणि 62 मध्ये ग्रामसेवक पदाचे प्रशिक्षण घेतले व सीरोंचा या अतिदुर्गम भागात ग्रामसेवक म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले 1964 ला शिरोंचा येथील खडतर मुख्यालय सेवा कालावधी यशस्वी रित्या पूर्ण केल्यानंतर आपले स्थानांतर पंचायत समिती मुल येथे झाले व विविध गाव खेड्यांमध्ये आपण आपली प्रामाणिक सेवा दिली.आपले वडील राजकीय क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत असले तरी त्याचा कुठेही बडेजाव केला नाही किंवा आपल्या नोकरीमध्ये त्याचा वापर करून घेतला नाही. शिक्षणासोबतच कबड्डी खो-खो व्हॉलीबॉल या सर्व खेळांमध्ये प्राविण्य मिळवले होते.
1978 मध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आणि ब्रह्मपुरी गडचिरोली मुल येथे त्यांनी सेवा दिली आपल्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या सेवा दिल्या निवृत्तीनंतर काँग्रेसचे सेवादलाचे तालुका अध्यक्ष म्हणून दहा वर्षे काम केले तसेच बरेच वर्ष त्यामध्ये सेवा दिली सेवानिवृत्त कर्मचारी संघटना असो पतंजली योग समिती असो भारत कृषक समाजाचे ज्येष्ठ नागरिक संघ मैत्री दल या विविध संघटनांची पदे भूषवली. हरिद्वार येथे योग्य प्रशिक्षण म्हणून प्रशिक्षण घेऊन मुल येथे अव्याहतपणे कित्येक वर्ष योग्य प्रशिक्षक म्हणून सेवा दिली.
विनोबांच्या सर्वोदय आंदोलनामध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला पेन्शन संघटना मूलचे अध्यक्षपदी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय संस्था चे सचिव म्हणून आजही आपण कार्यरत आहात आपल्या सामाजिक कार्यासोबतच खेड्यापाड्यात राहून सुद्धा आपल्या मुलांना आपण उच्च विद्या विभूषित बनवले आणि एकाला डॉक्टर एकाला इंजिनिअर आणि एकाला उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी बनविले. याचा गावतुरे कुटुंबासोबत समाजालाही आज अभिमान आहे.
अभिष्टचिंतन सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ .राकेश गावतूरे यांनी केले तर नामदेवराव गावतूरे यांची जीवन गौरव गाथा सन्मानपत्र डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी वाचून दाखविले. संचालन एड. मोहुर्ले यांनी केले. सोहळ्याला तीन तालुक्यासह जिल्ह्यातील असंख्य प्रतिष्ठित नागरिक ,समाज बांधव उपस्थित होते.