News34 चा दणका – चंद्रपुरातील व्हिडीओ गेम पार्लर कायमचे बंद होणार

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपुरात नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लर बाबत 18 सप्टेंबर ला News34 ने बातमी प्रकाशित केली होती, त्या बातमीची चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत कारवाईचा सपाटा सुरू केला होता, याबाबत 13 व्हिडीओ गेम पार्लरचा अहवाल प्रशासनाने नाकारला असून यासोबत जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर कायमचे बंद होणार अशी चिन्हे आहेत.

 

चंद्रपूर जिल्ह्यात व्हिडीओ गेम च्या नावाने सुरू असलेल्या जुगाराचा News34 ने पंचनामा करीत बातमी प्रकाशित केली होती, सदर बातमीने चंद्रपूर पोलीस व जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले होते, प्रशासनाने नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लर ची तपासणी सुरू केली, अनेकांचे परवाने नूतनीकरण झाले नसल्याची माहिती उघडकीस आली होती.

 

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांनी नियमबाह्य पध्दतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर धाडी मारल्या, मंजूर असलेल्या व्हिडीओ गेम मशीन सोबत अधिकच्या मशीन पोलिसांना आढळून आल्या होत्या, पोलीस व प्रशासनाचा कारवाईचा धडाका सुरू केला होता.

 

जिल्हाधिकारी गौडा यांनी व्हिडीओ गेम पार्लर धारकांची बैठक बोलावली व 15 ऑक्टोबर पर्यंत परवाण्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले, कालावधी संपल्यावर पोलीस विभागाने अहवाल व परवाना नूतनीकरण नाकारले, प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे व्हिडीओ गेम पार्लर संचालकांचे धाबे दणाणून गेले.

 

प्रशासनातील अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता आता जिल्ह्यातील नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाई होणार अशी माहिती दिली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!