Friday, June 14, 2024
Homeक्रीडाविद्यार्थ्यांचं शैक्षणिक-आर्थिक नुकसान थांबवा अन्यथा - निलेश बेलखेडे युवासेना

विद्यार्थ्यांचं शैक्षणिक-आर्थिक नुकसान थांबवा अन्यथा – निलेश बेलखेडे युवासेना

DBATU विद्यापिठाचा पुन्हा एकदा भोंगळ कारोभार

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – मागील काही वर्षांपासून कधी प्राध्यापकांच्या प्रलंबित पगाराला घेऊन चर्चेमध्ये राहणारे राजीव गांधीं अभियांत्रिकी महाविद्यालय हे यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिवर्सिटी (DBATU)लोनारे रायगड यांच्या वतीने होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भोंगळ कारभारामुळे चर्चेत आले आहे.

 

या विद्यापीठाच्या वतीने अभियांत्रिकी चे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मागील काही वर्षांपासून नाहक त्रासाला समोर जावं लागतं आहे त्यामुळे विविध प्रश्नांना घेऊन राजीव गांधीं महाविद्यालयाचे विद्यार्थी युवासेना कडे धाव घेत त्यांना होणाऱ्या शैक्षणिक व आर्थिक नुकसानापासून न्याय मिळवून द्यावे या मागणीला घेऊन विद्यार्थी प्रतिनिधीचे एक शिष्टमंडळ यामध्ये महाविद्यालय विद्यार्थी अध्यक्ष तेजस अल्लावार, वतन मादर, अक्षय उपगनलावार, रोहन आंबटकर, हेमंत गोरे, अनिकेत मानकर ,अथर्व कर्चे, विशाल कुलसंगे, वैभव किनाके व इतर विद्यार्थी मित्र इत्यादी हे शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या युवासेना सचिव पुर्व विदर्भ इंजि निलेश बेलखेडे यांना भेटले व सदर विषयावर एक निवेदन त्यांनी दिले. यापुर्वी सुद्धा निलेश बेलखेडे यांनी या विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवुन दिलेले असल्याने विद्यार्थ्यांनी बेलखेडे यांच्या कडे या प्रश्नांना सोडविण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली.

 

यामध्ये १) काही विद्यार्थ्यांचा मागील वर्षीच्या पास म्हणून आलेला निकाल विद्यापिठाच्या सिस्टम अपडेटमुळे चक्क सहा महिने तर काहिंचा एक वर्षानंतर नापास म्हणून आलेला आहे व त्यांना आता त्या विषयांची परिक्षा द्यावी लागणार आहे म्हणजे अश्या विद्यार्थ्यांना remedial परिक्षेची संधी पासून सुद्धा विद्यापिठाच्या चुकीमुळे वंचित राहावे लागले आहे . २)काहि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका ७-८महिने कालावधी झाल्या नंतरहि अजून आलेल्या नाही. ३)अंतिम वर्षातील विद्यार्थी पास होऊन अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर हि त्यांच्या गुणपत्रिका, डिग्री वेळेवर न मिळाल्याने त्यांना समोरच्या शिक्षणासाठी किंवा नोकरी साठी वंचित राहावे लागत आहे. ४) नियमीत सत्राची परिक्षेचा निकाल लागून अनुत्तीर्ण झालेल्या विषयांच्या फेरतपासनीचा निकाल न लागता त्यांना remidial चा फाॅर्म भरून परिक्षा द्यावी लागत आहे यामध्ये शैक्षणिक नुकसान सोबतचं आर्थिक भृंदड सुद्धा त्यांच्यावर पडआहे. ५) विद्यार्थ्यांचा मागील सेमिस्टर चा सप्लिमेंट चा निकाल आतापर्यंत लागलेला नाही त्यामुळे समोर च्या शैक्षणिक सत्रामध्ये ते पोहोचले कि नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांसमोर असून अभ्यास कसा करायचा या संभ्रमात विद्यार्थी पडले आहे. ६) विद्यापिठाच्या पोर्टलच्या चुकांमुळे काही विद्यार्थी विद्यापिठाच्या criterion नुसार विद्यार्थी हा समोरच्या सत्रासाठी pramote असून सुद्धा तो पोर्टल वर Not Pramoted दर्शवितो आहे. ७) आॅनलाईन पद्धतीने पेपर्स मुल्यांकन होत असून चुकिचे पेपर चेक होणे इत्यादी.

 

अश्या अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना समोरे जावे लागत असून यासंदर्भात काही दिवसांपूर्वी निलेश बेलखेडे यांच्या वतीने राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात जाऊन प्राचार्य प्रशांत पोटदुखे, रजिस्ट्रार व महाविद्यालयीन डिन यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली असता महाविद्यालय आपल्या वतीने या समस्येवर प्रयत्न करीत असून विद्यापिठ महाविद्यालयाच्या कुठल्याही मेल ला योग्य उत्तरे देत नसून याबाबत विद्यापीठ फारसं गंभीर नाही असे एकंदरित दिसून आले. त्यावेळी निलेश बेलखेडे यांनी या सर्वाच निराकरणाची जबाबदारी हि महाविद्यालयाची असून फक्त मोबाईल वर, मेल द्वारे हे प्रश्न सुटणार नसून महाविद्यालयाच्या वतीने विद्यापिठात रायगड येथे एक शिष्टमंडळ पाठवून तिथे विद्यापीठ कुलगुरू यांच्याशी चर्चा करून याबाबत तोडगा काढून विद्यार्थ्याचे शैक्षणिक व आर्थिक शोषण थांबवावे असे सांगितले त्यावेळी महाविद्यालयाच्या वतीने हे मान्य करण्यात आले परंतु अजूनही त्यावर काही कारवाई झालेली नाही.

 

हे विद्यापीठ विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी बनलेलं आहे कि विद्यार्थी पालकांची आर्थिक लुट करण्यासाठी बनलेलं आहे यावरून रोष व्यक्त करित युवासेना सचिव निलेश बेलखेडे यांनी येत्या काही दिवसांत याबाबत महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या समस्येचे गांभीर्य समजून शिष्टमंडळ पाठवून त्यांना या चुका निदर्शनास आणून देऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला नाही तर युवासेना च्या वतीने विद्यार्थ्यांना घेऊन तिव्र आंदोलन केल्या जाईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे – युवासेना सचिव इंजि.निलेश बेलखेडे यांच्या वतीने देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!