News34 chandrapur
चंद्रपूर – ३१ ऑक्टोबर ला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत साहारे यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपतालुका प्रमुख सुश्मित गौरकार यांनी वांढरी गावात होत असलेली अवजड वाहतूक 8 दिवसात बंद करावी अन्यथा युवासेना तर्फे याविरोधात आंदोलन उभारणार याबाबत जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
वांढरी ते वांढरी फाटा या मार्गाने गजानन कन्स्ट्रक्शन, ग्रेस व इतर कंपनीची अवजड वाहतूक होत असून त्या अवजड वाहतूकीमुळे गावामधे धुळीचे प्रमाण वाढत आहे. त्या धुळ आणि ध्वनी प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, हा मार्ग गावातील मुख्य मार्ग असल्यामुळे गावातील शाळाकरी विद्यार्थी शेतकरी गावकरी यांचा जाण्या येण्याचा रहदारी चा मार्ग आहे.
जड वाहतुकी साठी दुसरा पर्यायी मार्ग असून सुद्धा कि. मी. अंतर वाचवून डीझेल वाचविण्यासाठी गजानन कन्स्ट्रक्शन,ग्रेस व इतर कंपन्या ही जड वाहतूक शॉर्टकट वांढरी गाव ते वांढरी फाटा ह्या मार्गाने येणे जाणे करत आहे. भविष्यात या अवजड वाहतूकीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ही सर्व बाब लक्षात घेऊन ही अवजड वाहतूक ८ दिवसात बंद करण्यात यावी, अन्यथा युवासेना तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार यात आणखी काही नुकसान झाल्यास सर्वस्व प्रशासन जिम्मेदार राहणार असा इशारा देण्यात आला.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमराज भाऊ बावणे,केतन शेरकी,तुषार शेडामे,आकाश पावडे,चेतन कामडी, महेश जुनारकर,आयुष गौरकार उपस्थित होते.