200 युनिट ची थाप, आणि चर्चेत आली आप

News34 chandrapur

चंद्रपूर : मागील विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी निवडणुकीच्या काळामध्ये नागरिकांना 200 युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. आता निवडून येऊन चार वर्षे पूर्ण होऊनही ही मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे चंद्रपूर शहरातील जिल्हा आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आमदार जोरगेवार यांच्या विरोधात बॅनरबाजी सुरू झाली आहे.

 

हे फलक रीतसर परवानगी घेऊन लावण्यात आले होते. तरीही महानगर पालिकेने बॅनर काढण्याची कारवाई केली. आमदाराचा दबावाखाली मनपा ने बेकायदेशीर कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

 

चंद्रपूर शहरांमध्ये दोनशे बॅनर लावण्यात आले असून सर्वत्र आमदार जोरगेवार यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यात येत आहे. या बॅनरच्या माध्यमातून 200 युनिटच्या आश्वासन फोल ठरल्यामुळे लक्ष वेधण्यात आले आहे.

 

आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले की, आमदार जोरगेवार यांनी निवडणुकीच्या काळामध्ये दिलेल्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आमदार जोरगेवार यांनी तात्काळ 200 युनिट वीज मोफत देण्याची मागणी पूर्ण करावी, अन्यथा जनतेला माफीनामा आणि पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा आम आदमी पार्टीकडून आंदोलन करण्यात येईल.
या बॅनरमुळे चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!